सीपीआरसाठी विशेष आराखडा करावा

By Admin | Updated: December 23, 2015 01:22 IST2015-12-23T00:44:31+5:302015-12-23T01:22:52+5:30

महापौर आंदोलकांच्या भेटीला : बचाव कृती समितीची प्रवेशद्वाराजवळ निदर्शने

Special plan should be made for CPR | सीपीआरसाठी विशेष आराखडा करावा

सीपीआरसाठी विशेष आराखडा करावा

कोल्हापूर : येथे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात विविध प्रश्नांसंदर्भात मंगळवारी सीपीआर बचाव कृती समितीने प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली. सीपीआरला गतवैभव प्राप्त होण्यासाठी ‘विशेष आराखडा’ तयार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राहुल बडे यांच्याकडे यावेळी समितीने केली.
दरम्यान, महापौर अश्विनी रामाणे यांनी आंदोलनस्थळी दुपारी भेट दिली. त्या म्हणाल्या, रुग्णालयातील सुविधांबाबत गांभीर्याने विचार व्हावा, यासाठी आपण प्रभारी अधिष्ठात्यांना पत्र दिले. आम्ही आंदोलकांच्या पाठीशी राहू.
सीपीआर रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन हे अडीच वर्षे बंद असून खरेदी निविदेचा घोळ काही संपत नाही. १३ व्हेंटिलेटर मशीन असून ते मोडीत निघण्याच्या मार्गावर आहेत. हृदयशस्त्रक्रिया विभागातील रिक्तपदे भरण्याचे मंत्र्यांच्या आश्वासनाचे काय झाले? अपघात विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले
राज्य शासनाने आणीबाणीची परिस्थिती समजून सेवा-सुविधांसाठी ‘विशेष आराखडा’ करावा व प्राधान्याने उपकरण खरेदी व औषधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा, रोज सकाळी वरिष्ठ डॉक्टरांसह फिरती करावी. त्यामुळे अनेक प्रश्न निर्गत होतील. राजीव गांधी जीवनदायी योजना सक्षम बनविल्यास जिल्हा रुग्णालयाला हक्काचा निधी मोठ्या प्रमाणात मिळू शकेल, आदी मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलनाचे नेतृत्व समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी केले. यावेळी बबन रानगे, दिलीप देसाई, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, संभाजी जगदाळे, दिलीप पवार, भगवान काटे, प्रसाद जाधव, गौरव लांडगे, राजवर्धन यादव, सुखदेव बुध्याळकर, कादर मलबारी, मुश्ताक मलबारी, अशोक माळी, रवींद्र राऊत, संगीता राणे, दीपा डोणे, प्रा. शहाजी कांबळे, चंद्रकांत बराले, राजू हजारे, शिवाजीराव ससे, अ‍ॅड. चारुलता चव्हाण, शैलजा मोरे, मंगल कुऱ्हाडे, संगीता घोरपडे, सतीशचंद्र कांबळे, डी. जी. भास्कर, सदानंद डिगे, हिंदुराव शेळके, महादेव पाटील, अवधूत पाटील, रूपा वायदंडे, सयाजी घोरपडे, महेश जाधव, बबन सावंत, साजिद खान, अक्षय साळवी, आर. डी. पाटील, समीर काझी, एम. बी. पडवळे आदी उपस्थित होते.

Web Title: Special plan should be made for CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.