पौष्टिक न्याहारीचा खास मेन्यू ‘मटकी’--‘लोकमत’संगे जाणून घेऊ

By Admin | Updated: October 5, 2014 23:07 IST2014-10-05T22:46:21+5:302014-10-05T23:07:22+5:30

कोल्हापूर बाजारपेठ : दररोज तीन ट्रक आवक, मृदसंधारणासाठी उपयुक्त पीक--

A special menu of nutritious breakfast 'Matki' - 'Lokmat' will be learned | पौष्टिक न्याहारीचा खास मेन्यू ‘मटकी’--‘लोकमत’संगे जाणून घेऊ

पौष्टिक न्याहारीचा खास मेन्यू ‘मटकी’--‘लोकमत’संगे जाणून घेऊ

सचिन भोसले - कोल्हापूर -मटकीची सर्वसाधारणपणे कोल्हापूरच्या बाजारपेठेत दररोज तीन ट्रक इतकी आवक होते. यामध्ये पॉलिश मटकी व सेलम मटकी असे दोन प्रकार येतात. याचबरोबर बार्शीमधूनही गावरान जातीची मटकी विक्रीसाठी येते. मात्र, गेली काही वर्षे या मटकीच्या पिकाची केवळ स्थानिक बाजारपेठेतच विक्री केली जात आहे. मोठ्या प्रमाणात या जातीचे पीक अन्यत्र उगवून येत नाही. त्यामुळे केवळ स्थानिक बाजारपेठेतच ही मटकी विक्रीसाठी काही प्रमाणात येते. पॉलिश मटकी राजस्थान येथे पिकविली जाते. ती पॉलिश करण्यासाठी जळगाव, गुजरातच्या काही भागांत आणली जाते. तेथूनच ती संपूर्ण भारतात विक्रीसाठी नेली जाते.
मटकी हे कडधान्य कोरड्या व निमकोरड्या वातावरणात येते. मटकीचे बियाणे सर्वसामान्यपणे कोणत्याही मातीमध्ये उगवू शकते. भारतामध्ये मटकीला मोड आणून खाण्याची पद्धत आहे. मटकी हे प्रथिनांनी भरपूर असे कडधान्य आहे. ते केवळ भारतातच पिकवले जात नसून पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, आॅस्ट्रेलिया, अमेरिकन खंडातील काही देशांतही ते पिकविले जाते. भारतामध्ये १.५ मिलियन हेक्टर जमिनीवर मटकीची लागवड केली जाते. मटकीचे पीक हे मृद्संधारणासाठी अतिशय उपयुक्त आहे. मटकीसाठी जवळजवळ ५०० ते ७५० मिलिमीटर पावसाची गरज असते. भारतात ५० ते ६० मिलिमीटर पावसामध्येही मटकीची लागवड केलेली पाहावयास मिळते.

रोजच्या जेवणात भाज्यांचा कंटाळा आला की, बहुतांश महिला मोड आलेल्या कडधान्यांचा आधार घेतात. मात्र, यामध्ये मसूर, हरभरा, वाटाणा, चवळी या कडधान्यांपेक्षा मटकीचा समावेश जादा केला जातो. मटकी नुसतीच केली तर चविष्ट होत नाही; पण मोड आणून केलेल्या मटकीला चवही छान लागते. अशा मोड आलेल्या मटकीविषयी जाणून घेऊ ‘लोकमत’संगे.

मटकीचा वापर असा...
१भारतामध्ये मटकीला मोड आणून, ती उकडून सकाळी न्याहारीला खाल्ली जाते. याचबरोबर ज्यांना सॅलडसारखे खाण्यास आवडते, ते लोक मटकी दोन दिवस मोड आणण्यासाठी भिजवत ठेवतात.
२त्यानुसार कच्च्या, मोड आलेल्या मटकीमध्ये कांदा, टोमॅटो एकत्रित करून न्याहारीस घेण्याची पद्धतही अलीकडे मोठ्या प्रमाणात आहे. जिमला जाणाऱ्या युवकांमध्ये अशा प्रकारे मटकी खाण्याचे फॅड रुजू लागले आहे.
३वैद्यकीय तज्ज्ञांकडून मोड आलेली मटकी शरीरवाढीसाठी उपयोगी असल्याचा सल्ला दिला जात आहे. याचबरोबर मटकी भिजवून मोड आलेली किंवा तशीच उसळ म्हणून जेवणातही वापरली जाते.
४मटकीचा विशेष वापर कोल्हापुरी मिसळमध्ये केला जातो. तसेच मटकीची डाळही बाजारात मिळते. त्यातून ‘दलिया’ हा प्रकारही केला जातो. मटकीच्या डाळीच्या पिठाचे सांडगेही करून खाल्ले जातात.
५भारतात काही ठिकाणी आमटी व दाल हा प्रकार केला जातो. पश्चिम व उत्तर भारतात मटकीच्या डाळीचे पीठ करूनही वापरले जाते. मटकी भिजवून शिजवलेल्या अवस्थेत खाल्ल्यास त्यातील प्रथिने पचण्यास सोपे जाते.

Web Title: A special menu of nutritious breakfast 'Matki' - 'Lokmat' will be learned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.