शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Kolhapur : आरक्षणासाठी तातडीने विशेष अधिवेशन घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:06 IST

Maratha Reservation Kolhapur : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला सोयी-सवलती द्याव्यात व त्यासाठी राज्य सरकारने तातडीने दोनदिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देसकल मराठा समाजाचे छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला सोयी-सवलती द्याव्यात व त्यासाठी राज्य सरकारने तातडीने दोनदिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले.

आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोनामुळे संयम, शांततेमध्ये आंदोलन सुरू आहे. ते टप्प्याटप्याने आक्रमक केले जाईल, असा इशारा मराठा समाजाने सरकारला दिला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही केला.येथील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी साडेनऊ वाजता धरणे आंदोलन सुरू झाले. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला.

एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. त्यांनी आरक्षणासह अन्य मागण्यांचे फलक घेऊन दीड तास ठिय्या मारला. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

या आंदोलनात निवासराव साळोखे, महेश जाधव, दिलीप देसाई, सत्यजीत कदम, सुनील कदम, विजय सूर्यवंशी, सचिन चव्हाण, बाबा पार्टे, दिलीप सावंत, किसन भोसले, दिलीप पाटील, सचिन तोडकर, राजू सावंत, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, विजय जाधव, आशिष ढवळे, संपतराव पाटील, सुरेश जरग, गायत्री राऊत, विक्रम जरग, विजय माने, आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर