टीम गणेशातर्फे मूर्ती विसर्जनासाठी विशेष व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:47+5:302021-09-14T04:29:47+5:30
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील टीम गणेशा संस्थेतर्फे घरगुती गणपती विसर्जनासाठी नागाळा पार्क आणि महाव्दार रोडवर फोल्डेबल टँक ठेवण्यात ...

टीम गणेशातर्फे मूर्ती विसर्जनासाठी विशेष व्यवस्था
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील टीम गणेशा संस्थेतर्फे घरगुती गणपती विसर्जनासाठी नागाळा पार्क आणि महाव्दार रोडवर फोल्डेबल टँक ठेवण्यात येणार आहे. नागाळा पार्क येथील टँकमध्ये अमोनियबाय कार्बोनेटचा वापर करून विसर्जन केलेल्या मूर्तीचे विघटन कसे होते, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्ती, निर्माल्यच्या विसर्जनानंतर पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. हे रोखण्यासाठी टीम गणेशा संस्था प्रयत्न करीत आहे. चार फूट उंच मूर्ती विसर्जनासाठी फोल्डेबल टँक तयार करण्यात आला आहे. यामध्ये विसर्जित केलेल्या मूर्तीचे विघटन करण्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे. विघटनासाठी खायचा सोडा म्हणजे अमोनियबाय कार्बोनेटचा वापर कण्यात येतो.
कोट
बाजारपेठेत ४० ते ५० रुपये किलोने मिळणाऱ्या अमोनियबाय कार्बोनेटचा वापर करून घरच्या घरी विसर्जन केलेल्या मूर्तीचे विघटन करता येते. मूर्तीच्या वजनाइतका कार्बोनेटचा वापर करून ४८ ते १२० तास ठेवावा. विघटन पूर्ण झाल्यानंतर
तयार द्रावण खत म्हणून झाडास घालावे.
प्रशांत मंडलिक, अध्यक्ष, टीम गणेशा, कोल्हापूर