घरगुती गणेश सजावटीत ‘शाहू स्टेडियम’चा झगमगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:32+5:302021-09-12T04:29:32+5:30

कोलकत्ता, गोवा यांनतर कोल्हापूरला तिसरी फुटबाॅल पंढरी म्हणून देशात गौरविले जाते. याच नगरीत फुटबाॅल आणि त्याचे चाहते हजारोंच्या संख्येने ...

The sparkle of 'Shahu Stadium' with home Ganesh decorations | घरगुती गणेश सजावटीत ‘शाहू स्टेडियम’चा झगमगाट

घरगुती गणेश सजावटीत ‘शाहू स्टेडियम’चा झगमगाट

कोलकत्ता, गोवा यांनतर कोल्हापूरला तिसरी फुटबाॅल पंढरी म्हणून देशात गौरविले जाते. याच नगरीत फुटबाॅल आणि त्याचे चाहते हजारोंच्या संख्येने आपल्या तालीम मंडळावरील प्रेमापोटी एकत्रित येतात. हाच फुटबाॅल प्रेमाचा धागा पकडून पीटीएमचे आघाडीचे खेळाडू ऋषिकेश व अक्षय मेथे पाटील या बंधूंनी गेले तीन महिने राबून घरात चक्क शाहू स्टेडियमची प्रतिकृती तयार केली आहे. यात पारंपरिक पीटीएम-दिलबहार यांच्यातील विद्युत झोतातील सामनाही दाखविला आहे. याशिवाय दोघांना २००७ ते २०२० या कालावधीत मिळालेले मानसन्मान आदी चषक, सन्मानचिन्ह, दुचाकी असे सर्व काही या सजावटीत त्यांनी दाखविले आहे. याशिवाय कोल्हापुरातील आघाडीचे ८ वरिष्ठ गटातील सुपर संघांचे झेंडेही त्यांनी या मैदानात दाखविले आहेत. एकूणच घरातील वातावरणही फुटबाॅलमय केले आहे.

खेळ बंद तरीही प्रेम अखंड

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाहू स्टेडियमवर एकही फुटबाॅल स्पर्धा झालेली नाही. तरीसुद्धा कोल्हापूरच्या फुटबाॅल प्रेमींमध्ये आपल्या संघाप्रती आणि शाहू स्टेडियमबद्दल आस्था आहे. त्यामुळे या दोघांनी केलेली ही सजावट फुटबाॅल क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे अनेकजण ही सजावट पाहण्यासाठी मंगळवार पेठेतील त्यांच्या घरी हजेरी लावत आहेत.

फोटो : ११०९२०२१-कोल-मेथेपाटील

ओळी : कोल्हापुरातील मंगळवार पेठेत आघाडीचे फुटबाॅलपटू ऋषिकेश व अक्षय मेथे पाटील या बंधूंनी घरगुती गणेशासमोर साकारलेली शाहू स्टेडियमची प्रतिकृती.

Web Title: The sparkle of 'Shahu Stadium' with home Ganesh decorations