विद्यापीठात आज ‘स्पार्क फिल्म फेस्टिवल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:57+5:302021-06-19T04:17:57+5:30
केआयटी कॉलेजमध्ये कार्यशाळा कोल्हापूर : येथील केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिरिंगमधील टीम मॅवरिक्सने वेगळ्या कार्यशाळा मालिकेचे ...

विद्यापीठात आज ‘स्पार्क फिल्म फेस्टिवल’
केआयटी कॉलेजमध्ये कार्यशाळा
कोल्हापूर : येथील केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिरिंगमधील टीम मॅवरिक्सने वेगळ्या कार्यशाळा मालिकेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये संगीत, नृत्य, इथिकल हॅकिंग, थ्रीडी मॉडेलिंग, वेब डेव्हलपमेंट, रुबिक्स क्यूब, इंटरनेट ऑफ थिंग्स, कादंबरी लिखाण, कथाकथन, फोटोग्राफी आणि डिझायनिंग या विषयांवर स्वतंत्रपणे कार्यशाळा होणार आहेत. त्यामध्ये दहा वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कॉलेजमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये अभियान
कोल्हापूर : येथील डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये एनएनएस विभागातर्फे कोरोना जनजागृती अभियानाअंतर्गत दि. ५ व ६ जून रोजी मानसोपचारतज्ज्ञांचे व्याख्यान घेण्यात आले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निखिल चौगुले, समुपदेशक डॉ. शुभांगी पाटील यांनी कोरोना काळातील मानसिक स्वास्थ व आपले आरोग्य कसे जपावे, याविषयावर मार्गदर्शन केले. या व्याख्यानामध्ये पाडळी खुर्दचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले. प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. वैशाली सारंग, प्रदीप पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. अवधूत पाटील आणि श्रद्धा पाटील यांनी आभार मानले.