‘साखरेचा दर ३५०० केला तरच ऊसदर देणे शक्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 05:10 IST2018-10-22T05:10:05+5:302018-10-22T05:10:08+5:30
सध्या साखरेचा हमीभाव २९०० रुपये आहे. तो ३५०० ते ३६०० रुपये केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे या हंगामात ३५०० रुपये प्रतिटन ऊसदर देणे शक्य नाही.

‘साखरेचा दर ३५०० केला तरच ऊसदर देणे शक्य’
कोल्हापूर : सध्या साखरेचा हमीभाव २९०० रुपये आहे. तो ३५०० ते ३६०० रुपये केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे या हंगामात ३५०० रुपये प्रतिटन ऊसदर देणे शक्य नाही. कोल्हापूर दौ-यावर येत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून दर वाढवून द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी रविवारी केली. काँग्रेस कमिटीतील बैठकीस आलेले पी.एन. पाटील म्हणाले, अजून पहिली उचल ठरलेली नसल्यामुळे बॉयलर पेटले, मोळ्या गव्हाणीत पडल्या तरी प्रत्यक्षात गाळपास सुरुवात झालेली नाही.