दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: May 16, 2017 18:51 IST2017-05-16T18:51:29+5:302017-05-16T18:51:29+5:30
पुरस्कार प्रदान समारंभ २५ मे रोजी

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या २0१६ मधील ग्रंथ पुरस्कारांसाठी विश्वास नांगरे-पाटील, आनंद पाटील, विजय माळी, सचिन पाटील, डॉ. सुनिता बोर्डे, सिराज मोमीन, प्रकाश केसरकर,जयश्री दानवे यांच्यासह मान्यवर लेखकांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार प्रदान समारंभ गुरुवार, दि. २५ मे रोजी दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथील मिनि सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दरवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकस्थित मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. २0१६ या वर्षात प्रसिध्द झालेली ७२ पुस्तके पुरस्कारासाठी प्राप्त झाली होती.
डॉ. माहन पाटील, प्राचार्य विश्वास सायनाकर, डॉ. गिरिश मोरे, गोविंद गोडबोले यांच्या निवड समितीने ही निवड केली असल्याची माहिती उपाध्यक्ष गौरी भोगले आणि सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली आहे.
देवदत्त पाटील पुरस्कार : विजय माळी (आर्त माझ्या बहु पोटी-कादंबरी), शंकर खंडू पाटील पुरस्कार : सचिन वसंत पाटील (अवकाळी विळखा-कथा), शैला सायनाकर पुरस्कार : डॉ. सुनिता बोर्डे-खडसे (अस्तित्वाचा अजिंठा कोरताना-कविता), कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार : विश्वास नांगरे-पाटील (मन में है विश्वास-संकीर्ण), अण्णाभाउ साठे पुरस्कार : डॉ. आनंद पाटील (ग्रंथांनी रचलेला महापुरुष), चैतन्य माने पुरस्कार : सिराज बाबालाल मोमीन (आपण कुनापयकी?-प्रथम प्रकाशन), बालसाहित्य पुरस्कार : प्रकाश केसरकर (जंगल शाळा)
विशेष पुरस्कार : डॉ. आनंद यादव पुरस्कार : मधुबन पिंगळे (त्याने जग बदलताना पाहिले), वामन होवाळ पुरस्कार : डॉ. नलिनी महाडिक (इभ्रत), बाबुराव पेंटर पुरस्कार : अपर्णा पाटील (आॅस्कार), बाळ पोतदार (येणे वाग्यज्ञे), भूपाल हंकारे (गुरुदेव), विजयाग्रज (पैल), जयश्री दानवे (सांगितिक दीपस्तंभ), डॉ. सतिश कामत (दलित आत्मकथनातील व्यक्तिरेखा), डॉ. प्रशांत गायकवाड (आ.ह.साळुंखे विचारप्रवर्तक मुलाखती), डॉ. नितीन शिंदे (अंतराळ समजून घेताना), डॉ. एकनाथ आळवेकर (दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे वाड:मयीन कार्य), नंदू साळोखे (जांभळीखालचा झरा), बाबुराव पाटील (गावाकडची माती), दीपक फाळके (नकोय आम्हाला महासत्ता), युवराज कदम (कट्ट्यावरची पुस्तके), चैत्र (पायवाट), रमेश खंडागळे (सल)