शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा खणखणला शड्डूंचा आवाज, तब्बल नऊ महिन्यांनंतर तालमी, आखाडे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 12:28 IST

CoronaVirusUnlock, Wrestilin, Kolhapur कोरोनाच्या कहरामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले कोल्हापुरातील कुस्तीचे आखाडे, तालमी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शड्डूंचे आवाज व जोर-बैठकांचे हुंकार घुमू लागले आहेत.

ठळक मुद्देपुन्हा खणखणला शड्डूंचा आवाज, तब्बल नऊ महिन्यांनंतर तालमीआता लक्ष्य महाराष्ट्र केसरीकडे,आखाडे खुले

कोल्हापूर : कोरोनाच्या कहरामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले कोल्हापुरातील कुस्तीचे आखाडे, तालमी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शड्डूंचे आवाज व जोर-बैठकांचे हुंकार घुमू लागले आहेत.गेल्या २० मार्च २०२० पासून जगभरात कोरोनाचा कहर वाढला होता. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद करून सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यात सर्वाधिक शारीरिक जवळिकीचा खेळ म्हणून कुस्तीकडे पाहिले जाते. त्यामुळे बहुतांश खेळप्रकार सुरू झाले. मात्र, कुस्तीला सरकारने हिरवा कंदील दाखविला नाही. त्यामुळे नऊ महिन्यांनंतर १५ डिसेंबरपासून राज्यासह कोल्हापुरातील बहुतांश तालीम, आखाडे कोरोनापासून दक्षता बाळगून सुरू करण्यात आले.

यात कोल्हापुरातील शाहू विजयी गंगावेश तालीम, शाहूपुरी तालीम, शाहू आखाडा, आदी तालमींमध्ये आपापल्या गावी गेलेले मल्ल पुन्हा सरावासाठी दाखल झाले आहेत. या मल्लांनी वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे पुन्हा एकदा या तालमींमध्ये जोर-बैठकांचे हुंकार व शड्डूंचे आवाज घुमू लागले आहेत. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची अग्रणी तालीम म्हणून ओळखली जाणारी मोतीबाग तालीम मात्र, अद्यापही खुली करण्यात आलेली नाही. ही तालीम शनिवार (दि. १९) पासून सुरू होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे डिसेंबर-जानेवारी या महिन्यांत कुस्तीपंढरीत कुस्ती अधिवेशनाची आस लागते. त्यात महाराष्ट्र केसरीसह महाराष्ट्र चॅम्पियन आदी मल्लांच्या स्वप्नातील स्पर्धा होतात. महाराष्ट्र कुस्ती परिषदेने स्पर्धा जाहीर केली तर मिळालेल्या कालावधीचा उपयोग करून अनेक मल्लांनी बाजी मारण्याचा चंग बांधून तयारीला जोरदार सुरुवात केली आहे.

कुस्ती परिषदेने जर यंदाचे अधिवेशन जाहीर केले तर त्याकरिता मल्लांना सरावासाठी रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.- कृष्णात पाटील,कुस्ती प्रशिक्षक

 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीkolhapurकोल्हापूरCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक