नृसिंहवाडी येथे दिलासादायक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:26 IST2021-05-26T04:26:24+5:302021-05-26T04:26:24+5:30

शिवसेनेचे युवासेना तालुका युवा अधिकारी प्रतीक धनवडे यांनी श्री दत्त व्यापारी असोसिएशन नृसिंहवाडी दुकानदार व मालक, रिक्षाचालक यांची ...

Soothing atmosphere at Nrusinhwadi | नृसिंहवाडी येथे दिलासादायक वातावरण

नृसिंहवाडी येथे दिलासादायक वातावरण

शिवसेनेचे युवासेना तालुका युवा अधिकारी प्रतीक धनवडे यांनी श्री दत्त व्यापारी असोसिएशन नृसिंहवाडी दुकानदार व मालक, रिक्षाचालक यांची कोरोना अँटिजन टेस्ट मोफत करण्यासाठी कोरोनाच्या ७५ टेस्ट किट उपलब्ध करून दिल्या. तसेच खासगी स्वरूपाच्या २१ किट अँटिजन टेस्ट दुकानदार यांनी केली होती.

प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग पाखरे यांच्या अधिकारात भीम बोरगावे तसेच डॉ. प्रांजली पाटील, डॉ. अनिकेत यांनी कोरोना टेस्ट केली.

यावेळी माजी उपसरपंच अनंत धनवडे, शशिकांत बड्ड पुजारी, आनंद पुजारी, सुनील धनवडे, दिगंबर शेलार, गुरूप्रसाद धनवडे, जयवंत पतंगे, अवधूत धनवडे, हेमंत गवळी, संदीप पवार, योगेश गवळी, योगेश खिरुगडे, सागर मोरबाळे, गणेश सुतार, नीलेश बावलेकर, सुशील गवळी, संजय बड्ड पुजारी, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Soothing atmosphere at Nrusinhwadi