राधानगरी पंचायत समिती सभापतिपदी सोनाली पाटील निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST2021-07-28T04:26:30+5:302021-07-28T04:26:30+5:30

राधानगरी पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गटाच्या सोनाली शिवाजी पाटील (सोळांकूर)यांची निवड निश्चित ...

Sonali Patil confirmed as Radhanagari Panchayat Samiti chairperson | राधानगरी पंचायत समिती सभापतिपदी सोनाली पाटील निश्चित

राधानगरी पंचायत समिती सभापतिपदी सोनाली पाटील निश्चित

राधानगरी पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गटाच्या सोनाली शिवाजी पाटील (सोळांकूर)यांची निवड निश्चित असून महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फार्म्युलानुसार विद्यमान सभापती वंदना हळदे यांनी राजीनामा दिला आहे.

नव्या सभापतींची निवड ही गुरुवार दि.२९ जुलै रोजी होणार आहे.

सध्या राधानगरी पंचायत समितीवर राष्ट्रवादी पाच, काँग्रेस-चार व शिवसेना- एक या महाविकास आघाडी पक्षांचे सदस्य असून संयुक्त सत्ता आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सभापतींना कार्यकाल मिळणार असून याच्याअगोदर सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप कांबळे, दिपाली पाटील, वंदना हळदे व शिवसेनेचा सुशिला भावके यांनी काम पाहिले तर उपसभापती म्हणून काँग्रेसचे रविश पाटील, उत्तम पाटील राष्ट्रवादीचे मोहन पाटील यांनी काम पाहिले विद्यमान उपसभापती म्हणून काँग्रेसच्या वनिता पाटील काम पहात आहेत. तर सदस्य म्हणून कविता मोरे या आहेत.

Web Title: Sonali Patil confirmed as Radhanagari Panchayat Samiti chairperson