शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: ९ हजार रुपये घेतल्याचा संशय, डोक्यात वरवंटा घालून मुलाने केला वडिलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 11:46 IST

मृत दत्ताराम हे माजी सैनिक, शाहूवाडी तालुक्यातील घटना

मलकापूर: घरात ठेवलेले ९ हजार रुपये घेतल्याच्या संशयातून मुलानेच वडिल दत्ताराम संभाजी केसरकर (वय ८३) यांचा खून केल्याची धक्कादायक घटना शाहूवाडी तालूक्यातील उचत येथे घडली. याप्रकरणी आरोपी संतोष केसरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत साधना संतोष केसरकर यांनी शाहूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.गावडी येथील दत्ताराम केसरकर हे उचत येथे घर बांधून राहत होते. त्यांचा मुलगा संतोष याला दारुचे व्यसन होते. तो गावडी येथे शेती करीत होता. गुरुवार (दि.११) तो गावडीहून उचत येथे आला होता. संतोष यांने घरातील बॅगेत ठेवलेले पैसे आढळून न आल्याने पैशांबाबत चौकशी केली; मात्र कोणीही कबुली दिली नाही. यानंतर त्याने वडिलांवरच पैसे घेतल्याचा संशय घेतला. संतोष यांच्या मुलीच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी घरातील सर्वांच्या बरोबर आरोपी देखील गेला होता. मात्र पैसे कुणी घेतले हे त्याच्या डोक्यात विचार सुरु होता. कार्यक्रम अर्ध्यावर सोडून रात्री घरी येवून वडील दत्ताराम केसरकर यांचे बरोबर  पैशांच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात संतोष याने घरातील दगडी  वरवंटा डोक्यात मारून वडिलांना गंभीर जखमी केले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दत्ताराम केसरकर यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातील फरशीवरील रक्त ओढणीच्या साहाय्याने पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरातील सर्व मंडळी स्नेह संमेलन संपल्यावर घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. शाहूवाडी पोलिसांनी तातडीने दत्ताराम यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दत्ताराम यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Son Murders Father Over Missing Money Suspicion.

Web Summary : In Uchhat, Kolhapur, a son, suspecting his father of stealing ₹9,000, fatally attacked him with a stone grinder. The former soldier died at the scene, and the son has been arrested.