मुलगा व वडिलांचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:25 IST2021-05-18T04:25:52+5:302021-05-18T04:25:52+5:30
प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते असलेल्या पिराजी चौगले यांनी एकुलता असलेला मुलगा मनोहर याला चांगले शिक्षण दिले. शालेय जीवनापासून हुशार ...

मुलगा व वडिलांचे कोरोनामुळे निधन
प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते असलेल्या पिराजी चौगले यांनी एकुलता असलेला मुलगा मनोहर याला चांगले शिक्षण दिले. शालेय जीवनापासून हुशार असलेल्या मनोहर यानेही वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे स्वत:ला सिद्ध केले. सुरुवातीला पुणे येथे काही वर्षे काम करून चांगला जम बसविला. अनुभवाच्या जोरावर काही वर्षे अमेरिका, कॅनडा, जकार्ता, आदी देशांत मोठ्या कंपन्यांसोबत काम केले. गतवर्षीपासून तो घरातूनच काम पाहत होता.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात कोरोनाने प्रवेश केला होता. मात्र, त्याकडे गांभीर्याने न पाहता स्थानिक पातळीवर काही दिवस उपचार घेतले. मात्र, सुधारणा होण्याऐवजी दोघांचीही तब्बेत बिघडू लागली. त्यामुळे अखेर त्यांना कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात भरती केले होते. तेथे अनेक दिवस उपचार केले. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. आठ दिवसांपूर्वी मुलग्याचे व दोन दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले. मनोहर याच्या पश्चात पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, दोन वर्षांची मुलगी व आई आहे.