जयसिंगपुरात काहींना पर्याय शोधावा लागणार
By Admin | Updated: July 2, 2016 00:35 IST2016-07-02T00:34:55+5:302016-07-02T00:35:18+5:30
पालिका प्रभाग : १२ प्रभागांतून २४ जागांचे आरक्षण जाहीर; प्रभाग ६, ८, १० व ११ सर्वसाधारण--जयसिंगपूर नगरपालिका

जयसिंगपुरात काहींना पर्याय शोधावा लागणार
जयसिंगपूर : सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या प्रभाग आरक्षणाची सोडत शुक्रवारी पार पडली़ विद्यमान काही नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला असून,त्यांना पर्यायी प्रभागाचा आधार घ्यावा लागणार आहे़ तर सोयीच्या आरक्षणामुळे इच्छुकांनी फटाक्यांची आतषबाजी केली़
येथील श्री सिद्धेश्वर यात्री निवासच्या सभागृहात दुपारी तीन वाजता जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली़
प्रभाग ७ व १२ हे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असल्याचे जाहीर केले़ प्रभाग १२ अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला़ तर ६, ८, १० व ११ हे प्रभाग सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याचे जाहीर केले़ त्यानंतर मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी महिला व सर्वसाधारण गटासाठी असलेले प्रभाग आरक्षण जाहीर केले़
प्रभागनिहाय आरक्षण : प्रभाग १ अ : सर्वसाधारण महिला व ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग २ अ : महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण. प्रभाग ३ अ : महिला सर्वसाधारण, ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग ४ अ : गट महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब : गट सर्वसाधारण. प्रभाग ५ अ : महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब : सर्वसाधारण. प्रभाग ६ अ : महिला सर्वसाधारण, ब: सर्वसाधारण. प्रभाग ७ अ : महिला सर्वसाधारण,ब : अनुसूचित जाती. प्रभाग ८ अ : महिला सर्वसाधारण, ब : सर्वसाधारण. प्रभाग ९ अ : महिला सर्वसाधारण, ब: नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग १० अ : महिला सर्वसाधारण, ब : सर्वसाधारण. प्रभाग ११ अ : महिला सर्वसाधारण, ब : सर्वसाधारण. प्रभाग १२ अ : महिला अनुसूचित जाती, ब : सर्वसाधारण. राजेंद्र जाधव, अभिषेक चव्हाण व प्रथमेश मोरे या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या उचलल्या़