आठ मिनिटांत दोनशे गणिते सोडविली...
By Admin | Updated: March 6, 2015 23:44 IST2015-03-06T23:39:55+5:302015-03-06T23:44:08+5:30
देशात प्रथम क्रमांक मिळविला

आठ मिनिटांत दोनशे गणिते सोडविली...
आठ मिनिटांत दोनशे गणिते सोडविली...
लोणंद : चेन्नई येथे झालेल्या आॅल इंडिया अॅबॅकस स्पर्धेत हार्दिक अॅबॅकस अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत अवघ्या आठ मिनिटांत २०० गणिते सोडवली. त्याचबरोबर देशात प्रथम क्रमांक मिळविला.
लोणंद, ता. खंडाळा येथील हार्दिक अॅबॅकस अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत चांगले यश मिळविले आहे. या अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. ऋत्विक शेळके, प्रसन्न शेळके, समृध्दी चितोडे, सायली रासकर आणि दीक्षा रामटेके या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. (वार्ताहर)