‘जीएसटी’तील अडचणी दूर करू--अर्थमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:37 IST2017-09-09T00:36:44+5:302017-09-09T00:37:54+5:30

‘जीएसटी’तील अडचणी दूर करू--अर्थमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जीएसटी करप्रणालीतील प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रक्रियेत येणाºया अडचणी दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.
जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यभरातील व्यापारी-उद्योजकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यापार-उद्योजकांवरही विपरीत परिणाम होत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांशी अर्थमंत्री मुनगंटीवार व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत मुंबईतील मंत्रालयात संयुक्त बैठक झाली.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष ललित गांधी, समीर दुधगांवकर, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांच्यासह विविध पदाधिकाºयांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सहभाग घेऊन व्यापारी-उद्योजकांच्या जीएसटी विषयक अडचणी मांडल्या. तसेच याबाबतचे निवेदनही देण्यात आले.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे १४ सप्टेंबरला नाशिक येथे राज्यभरातील व्यापारी-उद्योजक यांची ‘राज्यस्तरीय जीएसटी परिषद’ आयोजित केल्याची माहिती देऊन अर्थमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले.
परिषदेस अर्थमंत्री मुनगंटीवार व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले. या राज्यव्यापी परिषदेत मांडल्या जाणाºया विषयावर राज्य सरकारकडून तत्काळ कार्यवाही केली जाईल. तसेच जीएसटी कौन्सिलच्या अखत्यारीतील विषय राज्यातर्फे प्रभावीपणे मांडून ते विषयही मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने मुंबईत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष ललित गांधी, समीर दुधगांवकर, आशिष पेडणेकर, आदी उपस्थित होते.