सैनिक टाकळी-चंदूर पुलाचा भराव काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:58+5:302021-07-01T04:16:58+5:30
शिरोळ : सैनिक टाकळी ते चंदूर कृष्णा नदीवरील होणाऱ्या पुलामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या पुलाला ...

सैनिक टाकळी-चंदूर पुलाचा भराव काढा
शिरोळ : सैनिक टाकळी ते चंदूर कृष्णा नदीवरील होणाऱ्या पुलामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या पुलाला जो भराव टाकला आहे, तो त्वरित काढण्यात यावा. भविष्यात पुलाचे काम करीत असताना भराव टाकण्यात येऊ नये, अशी मागणी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तातोबा पाटील यांनी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
कृष्णा नदीवरील सैनिक टाकळी-चंदूर पुलाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तथापि या पुलामुळे भराव टाकण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे हा भराव काढण्यात यावा, अशी मागणी या वेळी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सुदर्शन वाळके, मयूर माने, मिलिंद पाटील, विशाल मिरजे, रणजित पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.