पोखले येथील जवानाचे हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:44+5:302021-09-11T04:25:44+5:30
कोडोली : पोखले (ता. पन्हाळा) येथील जवान सागर शिवाजी निकम (वय ३४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन ...

पोखले येथील जवानाचे हृदयविकाराने निधन
कोडोली : पोखले (ता. पन्हाळा) येथील जवान सागर शिवाजी निकम (वय ३४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले. ते सध्या सुटीसाठी गावी आले होते.
सागर हे भारतीय सैन्य दलात २००६ मध्ये दाखल झाले होते. नाशिक येथील तोफखान्यात त्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले होते. सध्या ते २२६ फिल्ड रेजिमेंटमध्ये अलवर राजस्थान येथे कर्तव्य बजावत होते. सध्या ते एक महिन्याच्या सुटीवर गावी आले होते. गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बांबवडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती खालावू लागल्याने तातडीने शुक्रवारी त्यांना कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, सकाळी १० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पोखले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, आजोबा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि. १२ रोजी आहे. यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर पोवार, विविध संस्थांचे पदाधिकारी, कॉन्स्टेबल कृष्णनाथ पाटील यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
१० सागर