अपघातात जवानाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST2021-05-14T04:25:18+5:302021-05-14T04:25:18+5:30

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील येलुर गावाच्या हद्दीत अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत कडवे (ता. शाहूवाडी) येथील ...

Soldier killed in accident | अपघातात जवानाचा मृत्यू

अपघातात जवानाचा मृत्यू

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील येलुर गावाच्या हद्दीत अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत कडवे (ता. शाहूवाडी) येथील जवान सागर यशवंत पाटील (वय ३५) यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सांयकाळी हा अपघात झाला होता. जवान सागर पाटील गावाकडे सुटीवर आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कडवे येथील सागर पाटील हा आपल्या नातेवाईक यांना सोडून परत मलकापूरच्या दिशेने येताना येलुर गावच्या हद्दीत रत्नागिरीकडे जात असलेल्या अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली. यात सागर पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.

फोटो

१३ सागर पाटील

Web Title: Soldier killed in accident