विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई १३ हजाराची लाच घेताना जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:56+5:302021-01-08T05:20:56+5:30

कोल्हापूर : विद्युत ठेकेदाराचा परवाना मुंबई कार्यालयातून मिळवून देण्यासाठी कोल्हापूरच्या भवानी मंडपातील विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई (नाईक) हा सुमारे ...

A soldier in the electrical inspector's office was caught taking a bribe of Rs 13,000 | विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई १३ हजाराची लाच घेताना जाळ्यात

विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई १३ हजाराची लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर : विद्युत ठेकेदाराचा परवाना मुंबई कार्यालयातून मिळवून देण्यासाठी कोल्हापूरच्या भवानी मंडपातील विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई (नाईक) हा सुमारे १३ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात अडकला.

अरविंद मधुकर लबदे (वय ४३, रा. प्लॉट नं. ६०८, माने कॉलनी, तामगाव, ता. करवीर) असे संशयित लाचखोराचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी भवानी मंडपातील कार्यालयात त्याला लाचेच्या रकमेसह पकडले.

कोल्हापुरातील भवानी मंडपात विद्युत निरीक्षक कार्यालयात तक्रारदाराने विजेच्या कामासाठी ठेकेदारी परवाना मिळण्याबाबत पत्नीच्या नावे २०१९ मध्ये अर्ज केला होता. वर्षानंतरही परवाना प्राप्त झाला नसल्याने तक्रारदार स्वत: भवानी मंडपातील विद्युत निरीक्षक कार्यालयात गेले. त्यावेळी, ठेकेदारीचा परवाना मुंबई येथील कार्यालयात जाऊन आणण्यासाठी १३ हजार रुपये लाचेची मागणी विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई अरविंद लबदे याने तक्रारदारांकडे केली. तक्रारदाराने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांची भेट घेऊन माहिती दिली. पडताळणीमध्ये तक्रारदाराकडे लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भवानी मंडपातील पागा बिल्डींगमधील विद्युत निरीक्षक कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी अरविंद लबदे हा शिपाई तक्रारदाराकडून १३ हजाराची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात सापडला. त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. जितेेंद्र पाटील, सहा. फौ. संजीव बंबरगेकर, हे. कॉ. शरद पोरे, कृष्णात पाटील, रूपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.

तामगाव येथील घराची झडती

लाचखोर संशयित अरविंद लबदे याच्या तासगाव येथील घराची लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पो. नि. युवराज सरनोबत, सहा. फौजदार अमर भोसले, पो. हे. कॉ. अजय चव्हाण, विकास माने, संग्राम पाटील यांनी झडती घेतली. रात्री उशिरापर्यंत झडती सत्र सुरू होते.

फोटो नं. ०४०१२०२१-कोल-अरविंद लबदे(एसीबी आरोपी)

Web Title: A soldier in the electrical inspector's office was caught taking a bribe of Rs 13,000