चरण येथील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:39 IST2020-12-12T04:39:54+5:302020-12-12T04:39:54+5:30
अमित साळोखे २००९ मध्ये सीआरपीएफच्या १२३ व्या बटालियनमध्ये रूजू झाले होते. बालाघाट येथे सेवेवर असताना सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका ...

चरण येथील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
अमित साळोखे २००९ मध्ये सीआरपीएफच्या १२३ व्या बटालियनमध्ये रूजू झाले होते. बालाघाट येथे सेवेवर असताना सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते, गुरुवार त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज, शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान गावात पोहोचल्यानंतर चरण या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या निधनाची बातमी चरण या गावी त्यांच्या घरी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेने गावासह परिसरात शोककळा पसरली. अमित यांना दोन वर्षाची एक मुलगी, पत्नी, आई, वडील, बहीण, चार चुलते असा मोठा परिवार आहे.
११ अमित साळोखे