शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी आर. के. कामत, आज स्वीकारणार पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 13:59 IST

कोल्हापूरचे असणारे डॉ.आर.के. कामत सध्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत

कोल्हापूर : सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी मूळचे कोल्हापूरचे असणारे डॉ.आर.के. कामत यांची निवड करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉ. कामत सध्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणीस यांचा कार्यकाल आज शुक्रवारी (दि. ५) पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत या पदाचा कार्यभार डॉ. कामत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आज, शुक्रवारी कामत हे पदभार स्वीकारणार आहेत.डॉ. कामत यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, इलेक्ट्रॉनिक्स्, संगणक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. ते ऑस्ट्रोलियातील विकटोरियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील मानद प्राध्यापक आहेत.

सोलापूर विद्यापीठात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी मी प्रयत्लशील राहणार आहे. कुलपतींनी दाखविलेल्या विश्वासाबद्धल त्यांचे आभार. - आर.के. कामत, प्रभारी कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर