खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST2021-03-28T04:22:22+5:302021-03-28T04:22:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड ...

Soham Khasbardar Ajinkya in Open Selection Chess Tournament | खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार अजिंक्य

खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार अजिंक्य

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित सोहम खासबारदारने अजिंक्यपद तर द्वितीय मानांकित प्रणव पाटीलने उपविजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी दोघांचे समान साडेचार गुण झाल्यामुळे सरस टायब्रेकमध्ये पंधरा बक्खोल्झ गुण आधारे सोहम वरचढ ठरला. त्यामुळे त्याला विजेतेपद तर साडेतेरा बक्खोल्झ गुण मिळवत प्रणवला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या दोघांची निवड पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली असून हे दोघे कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकृत प्रतिनिधीत्व करणार आहेत. गुणांनुसार वरद आठल्येचा तिसरा क्रमांक,आयुष महाजनचा चौथा क्रमांक तर सारंग पाटीलचा पाचवा क्रमांक आला. या तिघांना राखीव खेळाडू म्हणून निवडले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे व सुधाकर जमादार यांच्या हस्ते झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, मुख्य पंच मनीष मारुलकर व निहाल मुल्ला आदी उपस्थित होते.

फोटो २७०३२०२१- कोल सोहम खासबारदार

फोटो २७०३२०२१- कोल

प्रणव पाटील

Web Title: Soham Khasbardar Ajinkya in Open Selection Chess Tournament