‘लोकमत’ रक्तदान मोहिमेस सामाजिक कार्यकर्त्याचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:10+5:302021-07-04T04:17:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘लोकमत’ने संपूर्ण राज्यभर सुरू केलेल्या रक्तदान मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगरूळ (ता. करवीर) ...

‘लोकमत’ रक्तदान मोहिमेस सामाजिक कार्यकर्त्याचे पाठबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘लोकमत’ने संपूर्ण राज्यभर सुरू केलेल्या रक्तदान मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगरूळ (ता. करवीर) येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जंगम यांनी स्वत: लोगो तयार करून तो गावात विविध ठिकाणी लावून रक्तदान माेहिमेत सहभागी होण्याचे ते आवाहन केले आहे.
राज्यातील कोरोनाची महामारी आणि त्यामुळे रक्ताचा झालेल्या तुटवडा, या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने २ जुलैपासून राज्यभर रक्तदान मोहीम सुरू केली आहे. समाजातून या मोहिमेला उत्स्फूर्तपणे पाठबळ मिळत आहे. आपापल्या परीने ही मोहीम अधिक बळकट करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. सांगरूळ परिसरात गेली अनेक वर्षे गणेशोत्सव काळात प्रबोधनपर व्यक्तिरेखा तयार करणारे चंद्रकांत जंगम यांनी ‘लोकमत’च्या रक्तदान मोहिमेचा प्रचार व प्रसार सुरू केला. त्यांनी ‘रक्तदान श्रेष्ठदान’, ‘लोकमत रक्ताचं नातं’, ‘रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा’, असे श्लोगन असलेले फलक स्वत: तयार करून गावातील मंदिरे आदी ठिकाणी लावली आहेत.
कोट-
‘लोकमत’ परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत महाराष्ट्रात काम केले. आज रक्ताची खरी गरज असताना त्यांनी रक्तदान माेहीम हातात घेऊन गरजू रुग्णांना खऱ्या अर्थाने जीवन दिले.
- चंद्रकांत जंगम, सांगरूळ
फोटो ओळी : सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत जंगम यांनी ‘लोकमत’ रक्तदान मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करणारे फलक लावले आहेत. (फोटो-०३०७२०२१-कोल- चंद्रकांत जंगम व चंद्रकांत जंगम०१)