यशवंत खाडे यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:21+5:302021-09-12T04:29:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगरुळ : सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत लहुजी खाडे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगाव आणि ...

Social Service Pride Award to Yashwant Khade | यशवंत खाडे यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कार

यशवंत खाडे यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगरुळ : सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत लहुजी खाडे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगाव आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या वतीने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आंतरराज्य "सामाजिक सेवा गौरव पुरस्कार" चिकोडी येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.

माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत, कर्नाटक जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघनावार, मराठा महासंघाचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यशवंत खाडे हे गेली अनेक वर्षे सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून, कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस या संस्थेतही ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गावातील श्री पांडुरंग विकास संस्थेचे चेअरमन आणि श्री दत्त दूध संस्थेत दीर्घकाळ संचालक आणि निवृत्ती भाजीपाला संस्थेत संचालक म्हणून काम पाहिले आहे. गावातील सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांनी शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आकाराम पाटील, सरदार खाडे, संदीप खाडे उपस्थित होते.

Web Title: Social Service Pride Award to Yashwant Khade