दत्त विकास सोसायटीची सामाजिक बांधीलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:19+5:302021-03-30T04:14:19+5:30

बुबनाळ : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील श्री दत्त विकास सोसायटीच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड १९ लसीकरण केंद्रास ...

Social Commitment of Datta Vikas Society | दत्त विकास सोसायटीची सामाजिक बांधीलकी

दत्त विकास सोसायटीची सामाजिक बांधीलकी

बुबनाळ : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील श्री दत्त विकास सोसायटीच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड १९ लसीकरण केंद्रास १५ प्लास्टिक खुर्च्या देण्यात आल्या. डॉ. मुकुंद घाटे-पुजारी यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे यांना खुर्च्या प्रदान करण्यात आल्या.

सोसायटीचे अध्यक्ष अनंत धनवडे म्हणाले, कोरोनाच्या संकटात नृसिंहवाडी येथे कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू झााल्याने प्रादुर्भाव कमी झाला आहे. नागरिकांनीही लसीकरणात सहभाग घेऊन कोरोना हद्दपार करावा, असे आवाहन केले. यावेळी उपाध्यक्ष बाळकृष्ण कंदले, अरुण आणुजे, बाळासाहेब कुन्नुरे, दत्तात्रय भोसले, सागर आणुजे, प्रतीक धनवडे, अवधूत धनवडे, दिगंबर शेलार, गुरूप्रसाद धनवडे, संदीप धनवडे, हेमंत गवळी, बाहुबली हिंगनगावे, भीमा बोरगावे उपस्थित होते.

फोटो - २९०३२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील कोविड-१९ लसीकरण केंद्रास दत्त विकास सोसायटीच्या वतीने प्लास्टिक खुर्च्या देण्यात आल्या.

Web Title: Social Commitment of Datta Vikas Society