राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:01+5:302021-06-27T04:17:01+5:30

पेठवडगाव : येथील काँग्रेसप्रेमी वडगाव यांच्या वतीने शनिवारी आमदार राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ...

Social activities on the occasion of Rajubaba Awale's birthday | राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पेठवडगाव : येथील काँग्रेसप्रेमी वडगाव यांच्या वतीने शनिवारी आमदार राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे यांच्या हस्ते बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्व.शिवाजीराव सालपे फाउंडेशनच्या कोविड सेंटर व पोलिसांना सेवादल तालुका सचिव रघुनाथ पिसे यांचे हस्ते फळे वाटप तर काँग्रेस सेवादल जिल्हा प्रवक्ते रणजीतसिंह पाटील, शहर अध्यक्ष काँग्रेस अनुसूचित-जाती विभागाचे विकास कांबळे यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्रावरील आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. तर वैभव घोरपडे यांनी आभार मानले.

यावेळी अदिलशहा फकीर, राजकुमार मिठारी, संदीप उंडाळे, राजमोहन पाटील, दगडू माने आदी उपस्थित होते.

२६ वडगाव राजू आवळे

फोटो कॅप्शन पेठवडगाव: येथे आमदार राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धांचा सत्कार करताना जिल्हा प्रवक्ते रणजितसिंह पाटील, अदिलशहा फकीर, राजकुमार मिठारी,

मोहन शिंदे,रघुनाथ पिसे आदी उपस्थित होते.

Web Title: Social activities on the occasion of Rajubaba Awale's birthday