शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

पंचगंगेकडे होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात कोल्हापूरकरांचे उपहासात्मक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 18:11 IST

River Kolhapur- सुमारे २२०० वर्षांचा इतिहास घेऊन वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या संवर्धनासाठी वेळ नसेल तर येथून पुढे कोणत्याही लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या वाढदिवसासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सांगत, जोवर कोसळलेल्या नदीघाटाची संरक्षक भिंत बांधत नाहीत, तोवर वाढदिवस होणार नाहीत, असा अनोखा निर्धार बुधवारी कोल्हापूरकरांनी केला.

ठळक मुद्दे...तर येथून पुढे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे वाढदिवस नाहीतपंचगंगा घाटावर आंदोलन करून १ मार्चपर्यंतचा दिला अल्टिमेटम्‌

कोल्हापूर : सुमारे २२०० वर्षांचा इतिहास घेऊन वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या संवर्धनासाठी वेळ नसेल तर येथून पुढे कोणत्याही लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या वाढदिवसासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सांगत, जोवर कोसळलेल्या नदीघाटाची संरक्षक भिंत बांधत नाहीत, तोवर वाढदिवस होणार नाहीत, असा अनोखा निर्धार बुधवारी कोल्हापूरकरांनी केला.पंचगंगा घाटावर कोसळलेल्या घाटाच्या ढिगाऱ्यावर झोपून, हातात भलामोठा फलक घेऊन येत्या एक मार्चपर्यंत दुरुस्ती केली नाही, तर नदीपात्रात उतरून आंदोलन करू, असा इशारावजा अल्टिमेटम्‌ही देण्यात आला.पंचगंगा नदी घाटाची संरक्षक भिंत चार महिन्यांपूर्वी ढासळली आहे, याकडे लक्ष वेधूनही अधिकारी, लोकप्रतिनिधी कोणीही दखल घेतली नाही. याचा निषेध म्हणून कोल्हापुरातील सामाजिक संस्था बुधवारी पंचगंगा घाटावर उतरल्या.

यात इंजिनिअरिंग असोसिएशन, शहरभान चळवळ, शहर कृती समिती, आखरी रस्ता समिती, परीख पूल कृती समिती, रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या संस्थांचे फिरोज शेख, अजय कोरोणे, जीवन बोडके, किशोर घाटगे, रमेश मोरे, अनिल घाटगे, संजयसिंह घाटगे, संतोष रेडेकर, संतोष आयरेकर, राजवर्धन यादव, शिवनाथ बियाणी, सुधीर हांजे, सुशील हांजे यांचा सहभाग होता.पंचगंगा घाटाचे संवर्धन करण्यासाठी टाळाटाळ होत असेल, त्यांना वेळ नसेल, तर त्यांच्या वाढदिवसासाठी जाणे, शुभेच्छा संदेशावर खर्च करण्यासाठी वेळ नाही, असे उपहासात्मक बॅनर हातात घेऊन या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर