शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जागे व्हा, नाही तर अस्थी कलश मंत्रालयात ठेवू, शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:28 IST

बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले.

कोल्हापूर : अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर सरकार अजूनही जागे होणार नसेल तर अस्थिकलश थेट मंत्रालयात आणून ठेवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थिकलश काल, रविवारी दुपारी कोल्हापुरात आला. नर्सरी बागेत शाहू समाधीस्थळी अभिवादन करून कलशातील अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा संघटना, मराठा महासंघ, मल्हार सेना, जय शिवराय शेतकरी संघटनेने यात सहभाग घेतला.

राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. लाखो टन ऊस शेतात तसाच ठेवून कारखाने बंद झाले आहेत. या उसाचे करायचे काय, असा प्रश्नाने शेतकरी हतबल झाला आहे. तरीही सरकारला याकडे बघायला वेळ नाही. मशीद, भोंगे, मंदिर या प्रश्नात सरकार अडकून पडले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणीही पाहायला तयार नाही, या उद्विग्नतेतून नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर तर शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे. त्यांचा अस्थिकलश राज्यभर फिरवला जात आहे. रविवारी हा कलश कोल्हापुरात आला.यावेळी शिवाजीराव माने, संपतराव पवार पाटील, बाबासो देवकर, बबन रानगे, वसंतराव मुळीक या कोल्हापुरातील नेत्यांबरोबरच यवतमाळचे सिकंदर शाह, परभणीचे माणिक कदम, कराडचे पंजाबराव पाटील, बी.जी. पाटील, विनायक पाटील यांनी पंचगंगा घाटावर जाऊन अस्थींचे विसर्जन केले. दरम्यान, सोमवारी कराडला प्रीतिसंगमावर अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी