स्नेहल परीट यांचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:01+5:302021-08-21T04:29:01+5:30
पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे योग्य पद्धतीने नियोजन करून निधी कमी असून देखील निधीचे वितरण व व्यवस्थापन ...

स्नेहल परीट यांचे कार्य कौतुकास्पद
पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे योग्य पद्धतीने नियोजन करून निधी कमी असून देखील निधीचे वितरण व व्यवस्थापन सुनियोजित करून पिंपळगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये त्यांनी चांगले काम केले असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केले.
ते स्नेहल परीट यांच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील ४० शाळा व १७ ग्रामपंचायतींना सॅनिटायझर मशीन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आबिटकर म्हणाले, पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा तसा डोंगराळ भाग असून पायाभूत सुविधांची उणीव आहे. या भागातील शाळा व ग्रामपंचायतींना सॅनिटायझर मशीनचा पुरवठा करून एक आदर्शवत काम परीट यांनी केले आहे.
यावेळी सभापती आक्काताई नलवडे, जि. प. सदस्या रोहिणी आबिटकर, माजी सभापती कीर्तीताई देसाई, माजी उपसभापती सुनील निंबाळकर, सरपंच श्रीधर भोईटे, सरपंच किरण गुरव, चंद्रकांत गुरव यांच्यासह पंचायत समितीचे खाते प्रमुख, ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते.