शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

हसत-खेळत क्षमतावृद्धी : पावसामुळं घरात बसून ‘बोअर’ झालेल्या बच्चेकंपनीसाठी अनेक खेळ उपलब्ध

By admin | Updated: July 25, 2014 22:16 IST

‘लोकमत’संगे जाणून घेऊ

प्रगती जाधव-पाटील ल्ल सातारापावसाळा सुरू झाला की छोट्या मास्टर्सना घरगडात कैद करण्यात येते. कितीही इच्छा असली तरी पाऊस आणि वाऱ्यामुळे त्यांना बाहेर खेळायला पाठवले जात नाही. त्यामुळे या चिमुकल्यांचा वैताग वैताग होतो. घरात बसून मग टीव्हीवर कार्टून बघणं किंवा मग आई-वडिलांच्या महागड्या फोनवर चाळे करणं याशिवाय त्यांना कोणताच पर्याय राहत नाही. पालकांनी मुलांच्या या घरात राहण्याचा सदुपयोग करून घेतला तर मुलांच्या मानसिक जडण-घडणीत त्याचा खूप उपयोग होऊ शकतो.पावसाळा म्हणजे लहान मुलांना घरात कोंडून घालण्याचा ऋतू असाच पालकांचा समज असतो. या दिवसांमध्ये बाहेरच्या वातावरणामुळे मुलांचाही त्रागा होतो. या त्राग्यातून गमतीशीर मार्ग काढला तर मुलांसह पालकांचाही वेळ अगदी मजेत जाऊ शकतो. आपल्या पाल्याच्या आवडीचे आणि त्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेण्यासाठी असे अनेक खेळ उपलब्ध आहेत. पालकांनी पाल्यासाठी आख्खा दिवस देण्यापेक्षा गुणात्मक एक तासाचा वेळ दिला तरी तो पुरेसा ठरू शकतो, हे यापूर्वीही सिध्द झाले आहे. मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्याकडून रचनात्मकदृष्ट्या चांगले प्रयोग करण्यासाठी हे खेळ उपयुक्त ठरतात. याबरोबरच आपल्या मुलाची जडणघडण आणि पुढे काय सुधराणा व्हावी या दृष्टीनेही या खेळांच्या माध्यमातून पालकांना अभ्यास करता येऊ शकतो.-मुलांना कुठल्या वस्तूचे किती ज्ञान आहे, हे माहिती करून घेण्यासाठीही एक खेळ आहे. -घरात नेहमी वापरात असणाऱ्या वस्तू दाखवून मुलांना त्याविषयी तीन वाक्ये बोलायला सांगा.-मुलांच्या चाणाक्ष निरीक्षणातून अनेक वस्तूंचे धम्माल उपयोग समजतात. एका शिबिरात विद्यार्थ्यांना उलथने दाखविले. त्यावर एका मुलाने धम्माल वापर सांगिंतला. तो म्हणाला, ‘चपाती भाजायला, भाजी हलवायला आणि मला मार द्यायला!’ उलथन्याचा असाही वापर होऊ शकतो हे सर्वांना नव्यानेच समजले.खेळांतून म्हणींची ओळखअलीकडच्या मुलांना म्हणींचा वापर केवळ भाषा आणि परीक्षा एवढ्यापुरताच राहिला आहे. मुलांना वर्षानुवर्षे चालत आलेल्या म्हणी पाठ व्हाव्यात या उद्दशाने म्हणींचा खेळ खेळला जातो. साधारण वाचता येणाऱ्या दुसऱ्या तिसरीतील मुलांबरोबर हा खेळ खेळता येतो. यात एका म्हणीचे दोन भाग करायचे उदा. एका चिठ्ठीवर हातच्या काकणाला.. आणि दुसऱ्या चिठ्ठीवर आरसा कशाला... असे लिहायचे. जेवढे गडी त्याच्या निम्म्या म्हणी दोन चिठ्यांमध्ये लिहायच्या. त्यानंतर या चिठ्ठी एकत्र करून प्रत्येक मुलाला चिठ्ठी घ्यायला लावायची. म्हणीचे दोन भाग एकत्र करून त्या मुलांची जोडी शोधायला लावायची. यामुळे मुलांना आपल्या परिचयाचे नसलेल्या मित्रांची ओळख होते व म्हणीही समजतात. अनेक शिबिरांमध्ये खेळातील सवंगडी शोधण्यासाठी हा खेळ खेळला जातो.रचनात्मकता वाढविण्यासाठीमुलांमध्ये रचनात्मका वाढविण्यासाठी आणखी एक खेळ खुप उपयुक्त ठरतो. घरातील कोणत्याही वस्तु घेवून त्यापासून मनोरा किंवा रांग बनवायला मुलांना सांगायचे. ज्याची रांग मोठी असेल तो त्यातील विजेता घोषित करायचे. घरात फळीवरील एक ना एक वस्तु खाली येईल आणि मुलं आपले मनोरे किंवा रांग तयार करण्यात मग्न होतील. काहीजण रांग सरळ करतील, कोणी नागमोडी करेल, कोणी आडवा मनोरा करेल तर कोणी उंच मनोरा करण्याच्या नाद राहिल. हे सगळं बघताना धम्माल वाटते. यातुन मुलांची रचनात्मकता वाढते. त्यानंतर ज्या वस्तु जिथून घेतल्या तिथे परत ठेवण्याचीही स्पर्धा घ्यायची. यामुळे पसारा आवरण्याची सवय लागते आणि घरातील वस्तुंची योग्य जागाही मुलांना समजते. हा खेळ आईचा त्रास कमी करणारा असल्याने पावसाळ्याच्या दिवसात खेळायला हरकत नाही.मालवण पाण्यामध्ये.... व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठीचा खेळ!दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘मालवण पाण्यामध्ये...’ हा खेळ व्यक्तिमत्त्व ओळख्णासाठी उपयुक्त आहे. जास्तीत जास्त मुलांना घेऊन हा खेळ खेळता येतो. यात प्रत्येकाने दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा धागा पकडून गाणे म्हणणे अपेक्षित आहे. उदा. मालवण पाण्यामध्ये किल्ला.. शिवाजी सांगा कसा शिरला... शिरला तर शिरला तो चिंटूला म्हणतो कसा... ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये’. यात चिंटू नावाचा मुलगा गार पाण्याने आंघाळ करतो हे त्या मुलाचे वैशिष्ट्य असते. अशीच वैशिष्ट्ये अन्य मित्रांच्या बाबतीतही शोधून काढून मुले गाणी म्हणू शकतात. यासारखेच चार वाजले कोंबडा अरवाला... सखू गेली पाण्याला... सखूला तिकडे कोण भेटले... काया... काया काय म्हटली.... अगं सखू काया अशी कशी गेली वाया....! या प्रकारात मुलांनी कविता किंवा गाण्याचा काही भाग स्वत: संपादित करून म्हणणं अपेक्षित असते. यातही यमक जुळवून मुलं पालकांना थक्क करणारी धम्माल गाणी सादर करतात. आपल्या मुलातील हे साहित्याचं अंग अनेक पालकांना ज्ञात नसते. ते यामुळे पालकांच्या समोर येते.वस्तूची आवड आणि व्यक्तिमत्त्वचार पाच मुलांबरोबर घरात खेळता येण्यासारखा आणखी एक खेळ आहे. मुलांची मानसिकता ओळखण्यासाठी त्यांना घरातील कोणतीही एक वस्तू आणायला सांगा. मुलं जी वस्तू आणतात, त्यावरून त्यांचे व्यक्तिमत्व समजते. कोणी दगड आणून मला असे ‘स्ट्राँग’ व्हायचे आहे म्हणतात. कोणाला सुईसारखे लहान व्हायचे असते तर कोणाला फुलासारखे ‘प्रिटी’ व्हायचे असते. यातून मुलांचा कलही समजतो.पेपर, टाचणी, कात्री अन् डिंकलहान मुलांमधील रचनात्मक गुण वृध्दिंगत करायचा असेल तर घरात उपलब्ध असलेल्या कागद, टाचणी, कात्री आणि डिंक मुलांसमोर ठेवा. याच्या माध्यमातून त्यांना काहीही बनवायला सांगा. आपल्या कल्पनेशक्तीनुसार मुलं छान छान कलाकृती तयार करतात. कोणी जोकरची टोपी बनवतं, कोणी रूमाल तर कोणी होडी बनवतं. मुलांनी जी काही वस्तू बनविली असेल त्याचे कौतुक पालकांनी केले पाहिजे. नेमकी हीच वस्तू का बनवावीशी वाटली हे विचारले तर मुलं आपल्या विचारशक्तीच्या पलीकडली उत्तरे देऊन पालकांना स्तब्ध करतात.स्मरणशक्ती वाढविण्यासाठीही खेळ...-साधारण तीन ते दहा वर्षांपर्यंत मुलांच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते. या काळात जर त्यांना स्मरणशक्ती वाढविण्याचे खेळ खेळायला दिले तर तो त्यांच्या मेंदूसाठी व्यायाम ठरतो. पावसाळ्याच्या दिवसात तर मुलांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर हा खेळ खेळता येऊ शकतो. -एका टेबलवर घरातील विविध प्रकारच्या दहा ते पंधरा वस्तू ठेवा. एकाच वेळी मुलांना या सगळ्या वस्तू बघून लक्षात ठेवायला सांगा. त्यानंतर दोन मिनिटाचा वेळ देऊन पाहिलेल्या वस्तू लिहून ठेवायला सांगा. जो सर्वाधिक वस्तू लक्षात ठेवेल त्याला बक्षिस म्हणून खाऊ द्या. ज्या मुलांना लिहिता येत नाही अशांना या वस्तूंची नावे सांगायला लावा. दोन-तीनदा खेळल्यानंतर मुलं वस्तू लक्षात ठेवून पटापट सांगू लागतात. हा स्मरणशक्तीचा उत्कृष्ट व्यायाम मानला जातो.लहानमुलांमध्ये शिकण्याची भरपूर तयारी असते. त्यांची स्मरणशक्ती अफाट असते. त्यांना नवनवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला खूप आवडतात. आपल्या कितीतरी पट अधिक त्यांची कल्पनाशक्ती कार्यरत असते. म्हणूनच विद्यार्थ्यांचे खेळाचे शिबिर घेताना त्यांना शिकविण्यापेक्षा आपले शिकणे अधिक होते. छोट्या-छोट्या गोष्टींतून मुलांचे धम्माल खेळ होतात. घरात पसारा आवरायचा असला तरी विद्यार्थ्यांना वस्तू नीट ठेवायचा खेळ खेळू या का, म्हटलं की ते हो म्हणतात आणि बघता-बघता पसारा जैसे थे होतो. - कैलास जाधव, शिबिर प्रशिक्षकउन्हाळ्याच्या सुट्टीत एक दिवसाच्या शिबिराला मी गेले. तिथे माझ्याच वयाच्या बऱ्याच मित्र मैत्रिणींबरोबर एक दिवस धम्माल केली. जोड्या लावणं, वस्तू निवडणं, टेबलावरच्या वस्तू लक्षात ठेवणं, पार्टनर ओळखणं यासारखे असंख्य खेळ आम्ही खेळलो. मला दगडासारखे स्ट्राँग बनायचे आहे. म्हणून तुला काय आवडते म्हटल्यावर मी ‘दगड’ असे उत्तर दिले. पावसात आई-बाबा घराबाहेर पाठवत नाहीत. मग मी आणि माझा दादा घरात यातले बरेच खेळ खेळतो. मला त्यातला वस्तू लक्षात ठेवून सांगणं आणि पसारा करणं हा खेळ आवडतो.- स्वरा तपासे, विद्यार्थीनी