‘शिवनेरी’चा धुव्वा

By Admin | Updated: December 17, 2014 00:15 IST2014-12-17T00:01:26+5:302014-12-17T00:15:17+5:30

केएसए फुटबॉल लीग :‘पोलीस’ची पीटीएम ‘ब’वर मात

The smell of 'Shivneri' | ‘शिवनेरी’चा धुव्वा

‘शिवनेरी’चा धुव्वा

कोल्हापूर : शाहू स्टेडियमवर के.एस.ए. फुटबॉल लीग सामन्यात आज, मंगळवारी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने शिवनेरी स्पोर्टस्वर ३-० ने मात केली, तर कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघाने पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ वर २-१ ने मात केली.
आज पहिला सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस् यांच्यामध्ये झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘बालगोपाल’कडून शॉर्टपासवर भर देत सामन्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. बालगोपालकडून झालेल्या चढाईमध्ये जयकुमार पाटीलच्या पासवर ऋतुराज पाटीलने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरून गेल्याने त्याची साधी संधी हुकली. त्यापाठोपाठ ‘शिवनेरी’कडून झालेल्या चढाईमध्ये सूरज जाधवने मारलेला फटका बालगोपाल संघाचा गोलरक्षक अक्षय कुरणे यांनी पंच करून बाहेर काढला. बालगोपालच्या ऋतुराज पाटीलने २३ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात १-०ने आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत बालगोपाल तालीम मंडळ आघाडी होते.
उत्तरार्धात बालगोपालने अधिक आक्रमक पवित्रा घेतला. सामन्याच्या प्रारंभास बालगोपालकडून ऋतुराज पाटीलच्या पासवर श्रेयस मोरेने गोल नोंदवत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. ७२ व्या मिनिटाला बालगोपाल संघाच्या बबलू नाईकच्या पासवर ऋतुराज पाटीलने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवत सामन्यात ३-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिल्याने बालगोपालने सामन्यात विजय मिळविला.
दुसरा सामना कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ यांच्यामध्ये झाला.
सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला ‘पोलीस’कडून अमोल चौगुलेने मैदानी गोल करत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ झालेल्या चढाईमध्ये पोलीस संघाच्या खेळाडूला पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ संघाच्या खेळाडूने अवैधरीत्या अडविल्याबद्दल पोलीस संघाला पेनल्टी देण्यात आली. यामध्ये सुनील घुमाईने अचूक गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत २-०ने आघाडी घेतली. उत्तरार्धात पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’कडून रोहित नलवडे, संग्राम शिंदे, रोहन जाधव, सूरज हकिम, गणेश पाटील यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या चढाया फोल ठरल्या.
सामना संपण्याच्या जादा वेळेत सूरज हकिमने गोल नोंदवत आघाडी कमी करण्याच प्रयत्न केला. मात्र, सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत ही पोलीस संघाची आघाडी कामय राहिल्याने पोलीस संघाने २-१ गोलफरकाने सामन्यात विजय मिळविला.

Web Title: The smell of 'Shivneri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.