कॉलेजमध्ये आयकार्डऐवजी ‘स्मार्ट कार्ड’

By Admin | Updated: July 7, 2015 01:07 IST2015-07-07T01:07:29+5:302015-07-07T01:07:29+5:30

अभिनव उपक्रम : कौन्सिल आॅफ एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार

'Smart card' instead of income tax in college | कॉलेजमध्ये आयकार्डऐवजी ‘स्मार्ट कार्ड’

कॉलेजमध्ये आयकार्डऐवजी ‘स्मार्ट कार्ड’

प्रदीप शिंदे / कोल्हापूर
पारंपरिक ओळखपत्रांऐवजी बारकोडसह नवे ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा अभिनव उपक्रम कौन्सिल आॅफ एज्युकेशन सोसायटीतर्फे राबविला जात आहे. महाविद्यालयातील प्रवेशासह ग्रंथालयातील देवघेव अशा विविध ठिकाणी हे ‘स्मार्ट कार्ड’ वापरता येणार आहे. या उपक्रमामुळे वर्षभर ओळखपत्र सांभाळण्याच्या कटकटीपासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ओळखपत्र असणे सक्तीचे असते. हे ओळखपत्र काढण्यापासून ते वर्षभर जपून ठेवण्यापर्यंत विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत होते. सध्या डिजिटलायझेशनचे युग आहे. त्याच दृष्टिकोनातून कोल्हापुरातील कौन्सिल आॅफ एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शैक्षणिक शाखेत यावर्षीपासून महाविद्यालयात ओळखपत्रांऐवजी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. हे स्मार्ट कार्ड विद्यार्थ्यांचा जोपर्यंत महाविद्यालयात प्रवेश आहे, तोपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच दरवर्षी ओळखपत्र, ग्रंथालय कार्ड काढण्याची गरज नाही. जशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, तसे त्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. भविष्यात या स्मार्ट कार्डद्वारे विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरीही घेण्याचा प्रस्ताव आहे.
६६६.२ँ्र‘२ँंल्ल.ल्ली३ वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी आपली संपूर्ण माहिती भरून कोणत्याही ठिकाणाहून नोंदणी करू शकतो. सर्व माहिती भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट फक्त महाविद्यालयात जमा करायची आहे. या प्रिंटद्वारे विद्यार्थ्याची सर्व माहिती घेऊन त्याला स्मार्ट कार्ड दिले जाईल. या स्मार्ट कार्डद्वारे विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तके घेऊन जाऊ शकतो तसेच विद्यार्थ्यांना ग्रंथालयात कोणती पुस्तके आहेत, कोणते पुस्तक जमा झाले याची माहितीसुद्धा वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. त्याचे काम सध्या सुरू असून यासाठी कॉर्मस कॉलेज ग्रंथालयाचे ग्रंथपाल तानाजी कांबळे व संग्राम रजपूत हे काम पाहत आहेत.
विद्यार्थ्यांची घेणार बायोमेट्रिक हजेरी
महाविद्यालयात प्रथम आम्ही सर्व ग्रंथालयातील पुस्तकांचे डिजिटलायझेशन केले आहे. त्यामध्ये ग्रंथालयातील ३५ हजार पुस्तकांचा समावेश आहे. त्याच्या पुढचे पाऊल म्हणून यावर्षीपासून महाविद्यालय ओखळपत्र हे ‘स्मार्ट कार्ड’ रूपात दिले जाणार आहे. त्यापुढे जाऊन या स्मार्ट कार्डद्वारेच विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकद्वारे घेण्यात येणार असल्याची माहिती कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य एस. बी. पाटील यांनी दिली.
यांचा समावेश....
कौन्सिल आॅफ एज्युकेशन सोसायटीच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, नाईट कॉलेज आॅफ आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्समधील सुमारे चार हजार ६०० विद्यार्थ्यांसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही हे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे.
 

Web Title: 'Smart card' instead of income tax in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.