चित्रनगरीजवळील झोपडपट्टी काढण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST2021-07-10T04:17:53+5:302021-07-10T04:17:53+5:30
कोल्हापूर : मोरेवाडी येथील कोल्हापूर चित्रनगरीलगत गट नं. ५० ब मध्ये झोपडपट्टी बांधून करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात यावे, अशी ...

चित्रनगरीजवळील झोपडपट्टी काढण्यात यावी
कोल्हापूर : मोरेवाडी येथील कोल्हापूर चित्रनगरीलगत गट नं. ५० ब मध्ये झोपडपट्टी बांधून करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी धनगर हौसिंग सोसायटीचे प्रदीप कदम व अजय माने यांनी जिल्हा प्रशासनाकडे शुक्रवारी केली.
याबाबत दिलेल्या निवेदनात चित्रनगरी हे कलाकारांचे श्रद्धास्थान असून कोल्हापूचे वैभव आहे, अशा ठिकाणी झोपडपट्टीचे झालेले अतिक्रमण बघून कलाकार येणार नाहीत. या नागरिकांनी पक्ष आणि समाजाचा झेंडा पुढे करून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अतिक्रमण झाल्याची माहिती तलाठी यांना देताच त्यांनी तुमचे काय जाते, जागा कुणाची तुम्हाला काय करायचे आहे, अशा शब्दात उत्तर देवून टाळाटाळ केली आहे. पुढील आठ दिवसांत हे अतिक्रमण निघाले नाही तर आम्ही चित्रनगरीचे वैभव टिकण्यासाठी उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अजय माने, सागर जाधव, विशाल कदम, संदेश किल्लेदार, करण ढोबळे उपस्थित होते.
-----