सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘कौशल्य अभ्यासक्रम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:26 IST2021-01-23T04:26:23+5:302021-01-23T04:26:23+5:30

कोल्हापूर : सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शिनोळी (ता. चंदगड) येथे उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलात किमान ...

‘Skills Courses’ for Frontier Students | सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘कौशल्य अभ्यासक्रम’

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘कौशल्य अभ्यासक्रम’

कोल्हापूर : सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शिनोळी (ता. चंदगड) येथे उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलात किमान कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार आहे. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘स्पोर्ट अवॉर्ड’च्या रकमेत शिवाजी विद्यापीठाने तिप्पटीने वाढ केली. याबाबतच्या ठरावांना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने शुक्रवारी मान्यता दिली. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के होते. बोर्ड ऑफ स्पोर्ट अवॉर्डअंतर्गत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, अडीच हजार, दोन हजार रुपये बक्षीस देण्यात येते. या रकमेत वाढ करण्याची शिफारस वित्त व लेखा समितीने केली होती. त्यानुसार आता या विजेत्यांना अनुक्रमे दहा हजार, साडेसात हजार आणि पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यास व्यवस्थापन परिषदेेने मान्यता दिली. विद्यापीठाच्या विदेशी भाषा अधिविभागात पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. क्रास्टाइब संघटनेला विद्यापीठ परिसरातील इमारतीमध्ये जागा देण्याच्या विषयावर पुढील बैठकीत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव, भारती पाटील, पी.आर. शेवाळे, आर.जी. कोरबू, अमित कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

Web Title: ‘Skills Courses’ for Frontier Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.