कौशल्यपूर्ण, रोजगारक्षम पदवीधर काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:34+5:302021-08-20T04:29:34+5:30
: कोरे फार्मसीत विद्यार्थ्यांसाठी रोजगार शिबिर लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : जगात भारत हा औषधनिर्माण आणि विक्रीसाठी चौथा, तर ...

कौशल्यपूर्ण, रोजगारक्षम पदवीधर काळाची गरज
: कोरे फार्मसीत विद्यार्थ्यांसाठी रोजगार शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : जगात भारत हा औषधनिर्माण आणि विक्रीसाठी चौथा, तर व्यवसायासाठी जगात १३ व्या क्रमांकाचा देश आहे. भारतामध्ये उत्पादित होणारी औषधे इंग्लंड, अमेरिका यासारख्या विकसित देशांमध्ये वापरली जातात. जगभरातल्या लसींमध्ये ६०% भारतीय लसी आहेत याचा अभिमान आहे. सध्या कौशल्यपूर्ण, रोजगारक्षम पदवीधर काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले.
वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी.एस्सी. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार क्षमता प्रशिक्षण शिबिर राबवले जात आहे. या शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्व व्यवसाय, तसेच सेवाक्षेत्र डबघाईला आलेले असताना औषधनिर्माण आणि विक्री क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
आमदार कोरे यांनी कौशल्यपूर्ण पदवीधर तयार करून त्यांना १०० टक्के नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी प्राचार्य जॉन डिसोझा यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी जनसुराज्याचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, शिबिरार्थी प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. प्रितेश लोले यांनी आभार मानले.
फोटो १९ वारणानगर विनय कोरे
ओळी : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी.एस्सी.पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार क्षमता प्रशिक्षण शिबिर झाले. त्यांचा सत्कार आमदार डॉ. विनय कोरे यांनी केला. यावेळी प्राचार्य डॉ.जॉन डिसोझा व शिबिरार्थी उपस्थित होते.