कौशल्यपूर्ण, रोजगारक्षम पदवीधर काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:28 IST2021-08-12T04:28:01+5:302021-08-12T04:28:01+5:30

वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बीएस्सी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार क्षमता प्रशिक्षण शिबिर राबवले जात ...

Skilled, employable graduates need time | कौशल्यपूर्ण, रोजगारक्षम पदवीधर काळाची गरज

कौशल्यपूर्ण, रोजगारक्षम पदवीधर काळाची गरज

वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बीएस्सी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार क्षमता प्रशिक्षण शिबिर राबवले जात आहे. या शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्व व्यवसाय, तसेच सेवाक्षेत्र डबघाईला आलेले असताना औषधनिर्माण आणि विक्री क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.

आमदार कोरे यांनी कौशल्यपूर्ण पदवीधर तयार करून त्यांना १००% नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी प्राचार्य जॉन डिसोझा यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर होत असलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले.

यावेळी जनसुराज्याचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, शिबिरार्थी सर्व प्राध्यापक उपस्थित होते प्रा. प्रीतेश लोले यांनी आभार मानले.

फोटो-

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी.एस्सी. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार क्षमता प्रशिक्षण शिबिराप्रसंगी आमदार डॉ. विनय कोरे, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा आदी.

Web Title: Skilled, employable graduates need time