स्केटिंग संघ निवड चाचणी उद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST2021-02-20T05:13:46+5:302021-02-20T05:13:46+5:30
ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी सात जणांची निवड कोल्हापूर : येथील जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सात खेळाडूंची १८ व्या राष्ट्रीय कनिष्ठ फेडरेशन ...

स्केटिंग संघ निवड चाचणी उद्या
ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी सात जणांची निवड
कोल्हापूर : येथील जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सात खेळाडूंची १८ व्या राष्ट्रीय कनिष्ठ फेडरेशन कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये दिग्विजय चौगले, विकास खोडके, रोहन कांबळे, श्वेता चिक्कोडी, विवेक मोरे, प्राजक्ता शिंदे, स्फूर्ती माने यांचा समावेश आहे. भोसरी (पुणे) येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये या खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना असोसिएशनचे अध्यक्ष आर. बी. पाटील, सचिव डॉ. सुरेश फराकटे यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण द्या
कोल्हापूर : महाविद्यालयांमध्ये सध्या ऑक्टोबर सत्रातील परीक्षांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या होणाऱ्या परीक्षेमध्ये खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात यावेत, अशी मागणी कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्या वतीने करण्यात आली. या सेलच्या शिष्टमंडळाने बुधवारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना निवेदन दिले.
शिवाजी विद्यापीठातील खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्याबाबत आम्ही गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. त्याबाबतची आमची मागणी व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेतही मंजूर झाली. मात्र, या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणाचा लाभ मिळालेला नाही. आगामी होणाऱ्या ऑक्टोबरच्या सत्रातील परीक्षेवेळी या विद्यार्थ्यांना प्राधान्याने ग्रेस गुण द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या शिष्यमंडळात क्रीड सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे, अनिल घाटगे आदींचा समावेश होता. यावेळी क्रीडा अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड उपस्थित होते.
फोटो (१९०२२०२१-कोल-ग्रेस गुण निवेदन) : शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण द्यावेत या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. यावेळी शेजारी अनिल घाटगे, पी. टी. गायकवाड आदी उपस्थित होते.