वळीवडेत सहा दुकाने फोडली : परिसरात भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:25 IST2020-12-06T04:25:09+5:302020-12-06T04:25:09+5:30

करवीर तालुक्यातील गांधीनगर ते चिंचवाड रोडवरील वळीवडे गावच्या हद्दीतील दोन किराणा मालाची दुकाने, एक मोबाईल दुकान, दोन हार्डवेअर दुकाने ...

Six shops blown up in Valiwade: Fear in the area | वळीवडेत सहा दुकाने फोडली : परिसरात भीतीचे वातावरण

वळीवडेत सहा दुकाने फोडली : परिसरात भीतीचे वातावरण

करवीर तालुक्यातील गांधीनगर ते चिंचवाड रोडवरील वळीवडे गावच्या हद्दीतील दोन किराणा मालाची दुकाने, एक मोबाईल दुकान, दोन हार्डवेअर दुकाने आणि एका ऑईलच्या दुकानात चोरी झाली. शनिवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान तीन अज्ञात चोरट्यांनी अशोक शेंडगे यांच्या साई समर्थ दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. ड्राॅव्हरमधील रोख पाच हजार रुपये लंपास केले. शेजारील इंद्रा मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दहा हजार रुपये व चांदीचे दागिने लंपास केले. संजय चव्हाण यांच्या हरिप्रिया सेल्स या बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाचा दरवाजा उचकटून दुकानातील सात हजार रुपयांवर डल्ला मारला, तर उमेश बजाजी यांच्या जीएसके हार्डवेअरमधून तीन हजार रुपये, तर अशोक चव्हाण यांच्या दत्त किराणा स्टोअर्समधून माणिकचंद, कोल्हापुरी गुटखा व अन्य साहित्य लंपास केले. महालक्ष्मी लुब्रीकेंटस् हे दुकानही फोडले. मात्र, येथे चोरट्यांच्या हताला काहीही लागले नाही. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो ओळ ०५ गांधीनगर चोरी

गांधीनगर-चिंचवाड या मुख्य रस्त्यावरील अज्ञात चोरट्यांनी फोडलेले किराणा मालाचे दुकान. (छाया - अनिल निगडे)

Web Title: Six shops blown up in Valiwade: Fear in the area