शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात सहा शाळा अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 16:54 IST

School Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या सहा शाळा अनधिकृत आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पालक आणि संबंधित संस्थाचालकांची असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जूनमध्येच जाहीर केले आहे. शासनाच्या नियमानुसार परवानगी न घेता काही शिक्षण संस्थांनी शाळा सुरू केल्या आहेत. त्यांच्या परवानगीच्या प्रस्तावांना शासनाकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अशा सहा शाळा अनधिकृत ठरल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात सहा शाळा अनधिकृत पन्हाळा, शाहूवाडीसह सहा तालुक्यांचा समावेश : एक हजार विद्यार्थी

कोल्हापूर : जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या सहा शाळा अनधिकृत आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पालक आणि संबंधित संस्थाचालकांची असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जूनमध्येच जाहीर केले आहे. शासनाच्या नियमानुसार परवानगी न घेता काही शिक्षण संस्थांनी शाळा सुरू केल्या आहेत. त्यांच्या परवानगीच्या प्रस्तावांना शासनाकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अशा सहा शाळा अनधिकृत ठरल्या आहेत.

शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, कागल, हातकणंगले, गडहिंग्लजमधील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते नववीच्या शाळांचा समावेश आहे. या शाळा सध्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा सुरू राहिल्यास बालकांचा मोफत व सक्तीचा कायदा अधिनियम २००९ नुसार कलम १८ (५) अंतर्गत दंड आकारण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिला आहे. दंड आणि कारवाई टाळण्यासाठी या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची नोंद अन्य शाळांमध्ये केली आहे.या शाळांना कारणे दाखवा नोटीससध्या जिल्ह्यात सहा शाळा अनधिकृत आहेत. शाळा, वर्ग सुरू करण्यासाठीच्या त्यांच्या परवानगीचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत. शासनाकडून परवानगी मिळेपर्यंत या शाळांची अनधिकृत शाळा म्हणूनच नोंद राहणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.विद्यार्थ्यांची अन्य शाळेत नोंदशासनाकडून परवानगी मिळेल याच्या प्रतिक्षेत संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची आपआपल्या परिसरातील जवळच्या शाळांमध्ये नोंद केली आहे. नोंद केलेल्या शाळांच्या माध्यमातून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात.आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • सन २०१९-२० शैक्षणिक वर्षात अनधिकृत शाळा : ६
  • सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षात अनधिकृत शाळा : ६
टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर