शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पुराच्या पाण्यातून शेताकडे जाताना ट्रॅक्टर उलटला, एकाचा मृत्यू; दोघे बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:52 IST

पाचजण सुदैवाने बचावले, बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू

कुरुंदवाड/ दत्तवाड : अकिवाट ( ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून जाताना ट्रॅक्टर उलटल्याने नऊजण बुडाले. एकाचा मृत्यू , एक गंभीर, तर दोघेजण बेपत्ता आहेत. अन्य पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास अकिवाट-बस्तवाड रस्त्यावर अकिवाट ओढ्यावर ही घटना घडली. सुहास पाटील (वय ५०, रा. अकिवाट) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरगदार व माजी सरपंच आण्णासाहेब हसुरे दोघेजण बेपत्ता आहेत, तर ट्रॅक्टरचालक रोहिदास माने गंभीर जखमी आहे. एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी एकूण सात बोटींच्या साहाय्याने दिवसभर कृष्णा नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली होती. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, तहसीलदार अनिलकुमार हेळकर घटनास्थळी दाखल झाले होते.आण्णासाहेब हसुरे यांची बस्तवाड रस्त्याला शेती असून, शेतात केळीचे पीक आहे. कृष्णा नदीच्या पुराचे पाणी या रस्त्यावर असल्याने हसुरे यांनी केळीचे घड काढण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये केळी तोडणीचे कामगार प्रदीप पाटील, अंगद मोहिते व अझहर मुजावर यांना घेऊन जात होते. ट्रॅक्टर असल्याने गावचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील, इकबाल बैरगदार, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रेणिक चौगुले, अरुण कोथळी ट्रॅक्टरमध्ये बसले, तर ग्रामपंचायत कर्मचारी अरुण कांबळे व सुहास माने चालकाला वाट दाखवत पुढे जात होते. पुलावर पुढे जात असताना पाण्याच्या प्रवाहाने ट्रॅक्टरचे चाक अलगद उचलल्याने ट्रॅक्टर उलटला.यावेळी काहीजण पोहत काठावर आले तर काहीजणांना मच्छीमारांनी बाहेर काढले. तोंडात, नाकात पाणी गेल्याने सुहास पाटील व रोहिदास माने बेशुद्ध झाले होते. त्यांना उपचारासाठी नेत असताना पाटील यांचा मृत्यू झाला तर चालक माने याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२००५ च्या महापुरातील घटनेची पुनरावृत्ती२००५ च्या महापुरात राजापूरमधील लोकांना बोटींच्या साहाय्याने बाहेर काढताना लष्करी बोट बुडाल्याने एका मुलासह दहा जणांचा मृत्यू झाला होता. याच परिसरात महापुराने पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. त्यामुळे २००५ च्या महापुरातील घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा परिसरात होती.

बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरूबेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी कृष्णा नदीत एनडीआरएफच्या तुकड्या, रेस्क्यू फोर्स, व्हाइट आर्मीचे जवान सात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम करत होते. मात्र सायंकाळपर्यंत त्यांना यश आले नव्हते.

अन् उपसरपंच थांबलेगावचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी मृत पाटील यांच्याबरोबर उपसरपंच आप्पासाहेब म्हैशाळेही जाणार होते. मात्र सकाळीच त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेल्याने या दुर्घटनेतून ते वाचले. त्यामुळे काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याची प्रचिती त्यांना आल्याची गावात चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरdrowningपाण्यात बुडणे