म्युकरचे आणखी सहा नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:11+5:302021-07-04T04:17:11+5:30
कोल्हापूर : म्युकरमायकाेसिस या बुरशीजन्य आजाराचे शनिवारी आणखी सहा नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील पाच रुग्ण सीपीआर ...

म्युकरचे आणखी सहा नवे रुग्ण
कोल्हापूर : म्युकरमायकाेसिस या बुरशीजन्य आजाराचे शनिवारी आणखी सहा नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील पाच रुग्ण सीपीआर तर एक रुग्ण केएमसी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, शनिवारी म्युकरमुळे एकही रुग्ण दगावला नाही, हे विशेष.
जिल्ह्यात म्युकरचे रुग्ण रोज आढळत आहेत. एका बाजूला उपचार व दुसऱ्या बाजूला मृत्यूही वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती, पण शनिवारी थोडाफार दिलासा मिळाला. मे महिन्यापासून म्युकरचा प्रसार वेगाने झाला. आतापर्यंत २५१ जण याने बाधित झाले आहेत, त्यापैकी तब्बल ५० जणांनी या पावनेदोन महिन्यात जीव गमावला आहे. तर सीपीआरमध्ये म्युकरवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे करुन अनेकांना जीवदानही मिळाले आहे. या आजाराचे ८८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर ११३ जण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत.