सहा लाखांचे अवैध सागवान जप्त

By Admin | Updated: October 17, 2015 00:49 IST2015-10-17T00:49:38+5:302015-10-17T00:49:38+5:30

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी चेक पोस्टवर सहा लाख रुपये किंमतीचे अवैध सागवान जप्त करण्यात आले.

Six lakh illegal sewen seized | सहा लाखांचे अवैध सागवान जप्त

सहा लाखांचे अवैध सागवान जप्त

आजरा : येथील अभियंता राजश्री जगदीश आपटे हिचा पुणे येथे वारजे पुलानजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला. आजरा शहरातील आपटे कुटुंबीयांसह राजश्रीचा समवयस्क मित्र परिवार, शिक्षक वर्ग यांना धक्का बसला असून, संपूर्ण आजरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजश्री ही आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी. शालेय जीवनापासून अभ्यासात नेहमीच आघाडीवर असे. शालेय स्पर्धांमध्ये सतत असणारी आघाडी मार्गदर्शक शिक्षक, सहकारी, मित्र परिवार यांच्यात आपलेपणा निर्माण करणारी होती. इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशनमधील पदवी घेतल्यानंतर पुणे येथे नातेवाइकांकडे राहून ती नोकरी करीत होती.
गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी परतत असताना पुणे येथे समोरून येणाऱ्या ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. गाडीवरून ती बाजूला फेकली गेली व चाकाखाली सापडली. गंभीर जखमी झालेल्या राजश्रीचे उपचार होण्यापूर्वीच निधन झाले. तिच्या अंत्यसंस्कारावेळी प्रचंड गर्दी झाली होती. महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनीला, मैत्रिणीला मुकल्याचे दु:ख मात्र राजश्रीच्या शिक्षक व मित्र परिवाराला लपविता येत नव्हते.
परदेशात नोकरीची तयारी
पंधरवड्यापूर्वीच राजश्रीने परदेशात असणारी चांगल्या नोकरीची संधी असल्याने पासपोर्टचे कामही पूर्ण करून घेतले होते, तर घरी असणारे आई-वडील व थोरली विवाहित बहीण धनश्री यांनी राजश्रीकरिता वर संशोधनही सुरू केले होते; पण दुर्दैव आड आले.
 

Web Title: Six lakh illegal sewen seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.