कोरोनामुळे सहाजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:29 IST2021-09-24T04:29:03+5:302021-09-24T04:29:03+5:30

कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या या पंधरवड्यात ...

Six killed by corona | कोरोनामुळे सहाजणांचा मृत्यू

कोरोनामुळे सहाजणांचा मृत्यू

कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या या पंधरवड्यात कमी येत असताना, अचानक पुन्हा ही संख्या वाढली आहे. नवे ४८ रुग्ण आढळले असून, २३ जणांनी काेरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ५६० जणांवर उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर शहरामध्ये २५ नवे रुग्ण आढळले आहेत. आजरा, भुदरगड, चंदगड, राधानगरी या तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, तर उर्वरित तालुक्यांमध्ये एक ते चारपर्यंत रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. इचलकरंजीमध्ये दोन, तर जयसिंगपूरमध्ये एक नवा रुग्ण नोंदवण्यात आला आहे. शिंदेवाडी, शाहूनगर कोल्हापूर, कवठेमहांकाळ, हातकणंगले तालुक्यातील आळते, गडहिंग्लज आणि सनदी मळा, कबनूर या ठिकाणच्या सहाजणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Six killed by corona