शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात केएमटीचे सहाशे कर्मचारी संपावर, प्रवाशांची गैरसोय होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:20 IST

३० नोव्हेंबरपर्यंत मागण्यावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते

कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही महापालिका प्रशासनाने बोळवण केल्यामुळे केएमटीच्या ऑफीस, वर्कशॉप, वाहतूक विभागातील सुमारे ६०० कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे आज, शुक्रवारपासून, शहरातील केएमटीची बस सेवा खंडित होणार आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, शाळा महाविद्यालयेही दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत संप सुरू झाल्याने प्रवाशी वर्गाची गैरसोय होणार आहे.महानगरपालिका परिवहन विभागाच्या (केएमटी) कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्याबाबत प्रशासनाला दिवाळी सणाच्या तोंडावर निवेदन देऊन संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, प्रशासक के. मंजूलक्ष्मी रजेवर असल्याने त्यावेळी निर्णय घेणे अवघड झाले होते. तेंव्हा ३० नोव्हेंबरपर्यंत मागण्यावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यामुळे तात्पुरता संप स्थगित करण्यात आला होता.परंतु ३० नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने दुपारपासूनच केएमटी कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली. दुपारच्या पाळीत कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानक रजा घेतल्याने अनेक मार्गावरील बसगाड्या कर्मचाऱ्यांअभावी बंद झाल्या. रात्री मुक्कामाला जाणाऱ्या १८ गाड्या कर्मचाऱ्यांमुळे जाऊ शकल्या नाहीत. मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी संपावर जात असल्याचे म्युनिसिपल ट्रान्स्पाेर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी जाहीर केले.राेजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहून तसेच राज्य सरकारची परवानगी घेऊन प्रक्रिया राबविण्यात येईल, असे प्रशासनाकडून गुरुवारी सांगण्यात आले. त्यावर युनियनने आस्थापनावरील सर्व पदे यापूर्वीच मंजूर असून रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती करायची असल्याने पुन्हा सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे सरनाईक यांनी प्रशासनाला सांगितले. तरीही प्रशासनाने आपली भूमिका बदललेली नाही. केएमटीकडे कंडक्टरची ८१ तर चालकांची ८० पदे रिक्त आहेत. ती भरावीत अशी प्रमुख मागणी युनियनने केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप