उघड्यावर जुगार खेळणाऱ्या सहाजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST2021-06-25T04:18:56+5:302021-06-25T04:18:56+5:30

इचलकरंजी : येथील महात्मा गांधी हौसिंग सोसायटी परिसरातील जिमसमोर उघड्यावर जुगार खेळणाऱ्या सहाजणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७४ ...

Six arrested for open gambling | उघड्यावर जुगार खेळणाऱ्या सहाजणांना अटक

उघड्यावर जुगार खेळणाऱ्या सहाजणांना अटक

इचलकरंजी : येथील महात्मा गांधी हौसिंग सोसायटी परिसरातील जिमसमोर उघड्यावर जुगार खेळणाऱ्या सहाजणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दीपक अशोक सोनुले (वय ३२), रमेश शंकरर गेजगे (४६), रोहित प्रफुल्ल भोरे (३२), प्रकाश ऊर्फ किरण बबन गेजगे (२३), महादेव मलगोंडा इंगळे (३०) व अजय वसंत मोहिते (२५, सर्व रा. महात्मा गांधी हौसिंग सोसायटी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी हे सर्वजण सायंकाळी उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून तीन मोबाईल, जुगाराचे साहित्य, एक मोटारसायकल, रोख रक्कम असा सुमारे ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तसेच संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Six arrested for open gambling