शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

शिवपावन पदभ्रमंती सळसळत्या उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:56 IST

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘हर-हर महादेव’, अशा घोषणा, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सळसळता उत्साह अशा वातावरणात

ठळक मुद्देपावनखिंड परिसर जयजयकाराने दुमदुमला : शिवाजी विद्यापीठ, सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘हर-हर महादेव’, अशा घोषणा, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सळसळता उत्साह अशा वातावरणात शिवपावन पदभ्रमंती मोहीम सोमवारी पार पडली.शिवाजी विद्यापीठ आणि सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे किल्ले पन्हाळा ते पावनखिंड परिसर अशी ‘शिवपावन पदभ्रमंती’ मोहीम रविवारी (दि. १) आणि सोमवारी आयोजित करण्यात आली होती. सह्याद्री प्रतिष्ठानचे चीफ पेट्रन खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, ज्येष्ठ शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव, रवी धडेल, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे उपस्थित होते. शिवपावन पदभ्रमंती मोहिमेचा समारोप सोमवारी पावनखिंडीत झाला. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते पावनखिंड परिसरातील फरसबंदी मार्गाचे पूजन करण्यात आले.याआधी पांढरेपाणी ते पावनखिंडमार्गे पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी विद्यार्थी रोमांचित झाले. यावेळी येळवण-जुगाईचे उपसरपंच सत्यवान खेतल यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शिंदे आणि पांढरेपाणी येथे सर्वप्रथम पोहोचलेल्या अर्जुन मिरजकर, शुक्रिया मगदूम यांचा सत्कार करण्यात आला. राजनंदिनी पाटील व कैवल्य शिंदे या पाचवर्षीय चिमुरड्यांनी ही मोहीम पूर्ण केली. यावेळी डॉ. डी. आर. मोरे, पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, एनएसएसचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, मलकापूरचे नगरसेवक सुहास पाटील, नागरबाई शिंदे, अनिता शिंदे, डॉ. संगीता पाटील, प्राचार्य डी. डी. कुरळपकर उपस्थित होते. दरम्यान, पदभ्रमंती मार्गावरील वाड्या-वस्त्यांवरील मुलांना कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते दप्तरांचे वाटप झाले. करपेवाडी मुक्कामी शाहीर रंगराव पाटील यांनी शाहिरी सादर करत विद्यार्थ्यांची मने जिंकली. इतिहास अभ्यासक राम यादव यांनी पन्हाळा ते पावन परिसर घडलेल्या इतिहासाची, तर अभिलेखापाल गणेशकुमार खोडके यांनी ‘शिवरायांची पत्रे’ याविषयी माहिती दिली.कुलगुरूंचा सहभागकुलगुरू डॉ. शिंदे यांनी सुमारे ५५ किलोमीटरची शिवपावन पदभ्रमंती मोहीम कुटुंबीयांसह यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेत पत्नी अनिता, मुलगा शंतनू, मुलगी कैरवी यांच्यासह सहभागी झाले होते.शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन तरुणांनी समाजाभिमुख विकास घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी मोहिमेच्या समारोपावेळी केले. ते म्हणाले, आजही पावनखिंडीचा इतिहास तरुणाईला जाज्ज्वल्य देशप्रेमाची प्रेरणा देत आहे. ही प्रेरणा आत्मसात करून तरुणांनी समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे.