शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

विकास साधण्यासाठी सीतेचा राम अयोध्यातून गोकुळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 12:15 IST

Police Kolhapur : सीता-रामाच्या फायद्यासाठी वानरसेना घेऊन दुसऱ्याच्या हद्दीत चढाई करून सगळ्यांना घेऊन डुबणाऱ्यांची व ५० लाखांच्या मागणीची चर्चा सध्या कोल्हापूरच्या पोलीस दलात सुरू आहे.

ठळक मुद्देविकास साधण्यासाठी सीतेचा राम अयोध्यातून गोकुळातपनामावर केली चढाई : पन्नास लाखांच्या मागणीची पोलीस खात्यात चर्चा

तानाजी पोवारकोल्हापूर : एखाद्याला कोणत्याही गुन्ह्यात गुंतवायचेच असेल, तर त्याला खाकी कशाही पध्दतीने गुंतवू शकते, त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी आर्थिक ढपलाही पाडण्यासाठी यंत्रणा पुढे सरसावते, त्याला प्रतिसाद मिळाली नाही, तर जुन्या गुन्ह्यात कलमे वाढवण्याची शक्कलही लढवली जाते. असाच काहीसा प्रकार कोल्हापूरच्या शाहूनगरीत घडला. सीता-रामाच्या फायद्यासाठी वानरसेना घेऊन दुसऱ्याच्या हद्दीत चढाई करून सगळ्यांना घेऊन डुबणाऱ्यांची व ५० लाखांच्या मागणीची चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे.महिन्यापूर्वी कोल्हापूर शहराच्या शाहूनगरीत खाकीने एका ठिकाणी कारवाई करत स्वत:चा विकास साधला. विकासाचे धागेदोरे शोधण्याचे निमित्त काढून त्याच रात्री गुपचूप अंधारात ह्यपनामाह्ण हे लहानग्यांचे खेळण्याचे ठिकाण गाठले. खरे तर गोकुळात शिरकाव करून त्यांनी हद्दपारीच केली. बंद पनामाच्या मुख्य गेटवरून आवारात उडया टाकून सात ते आठ खाकी च्या वानरसेनेने "सीता-रामा"च्या साक्षीने अक्षरशा दरोडाच टाकला. 

पनामाच्या मुख्य इमारतीत प्रवेश करताना दरवाजाचे शटर, कडीकोयंडा तोडला. आत लाईट न लावताच बॅटरीच्या उजेडात सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ तपासणीत घालवला. पुढे चार दिवसँत ह्यपनामाह्णच्या मालकास खाकीवर कृपादृष्टी असलेल्या विनायकने ५० लाखाचा निरोप धाडला. त्यानंतर आता गेले काही दिवस हा ढपल्यासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला आहे."विनायक" पावला"राजारामा"च्या नगरीवर अलीकडे मांडवातील "विनायका"ची चांगलीच क्रुपाद्रुष्टी लाभलीय. साहेबांच्या क्रुपेने इथं त्याचा वावर वाढलाय. कोणत्याही शुभलक्ष्मी कामात इथं ४०-६० विभागणीचा डाव ठरलाय. गेल्या महिन्यात मध्यरात्री त्यांचा विकासचा गेम साधला.

कारवाईच्या धास्तीनं "खाकी"च्या आवारातच मध्यरात्री दीड वाजता आलिशान गाडीत बसून "विनायका"ने सात लाखाचा डाव साधला. इतक्या मध्यरात्री साहेबही केबीनमध्येच बसूनच होते. काही वेळाने तेही बाहेर येऊन विनायकासोबत हिश्श्याच्या विभागणीसाठी गाडीतून निघून गेले. आवारातील तिसऱ्या डोळ्यांची तपासणी केल्यास सारेच प्रकाशमान होईल."गोकुळा"त अतिक्रमण"राजाराम"ची धाव तशी मध्यवस्ती, उपनगरापर्यंत... पण त्यांनी आपली हद्दपार करत "गोकुळा"तील कंदलगावात शिरकाव केला. तेथे रात्री गुपचूप छापाही टाकला, पण कारवाई पूर्वी अगर कारवाईनंतर शासकीय नजर असणाऱ्या "सीसीटीएनएस" वर त्याची नोंद न केल्याची चर्चा आहे, त्याचे परिणामही त्यांना लवकरच भोगावे लागणार, हे निश्चित!

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर