शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसआयटीकडून वाघमारेची तासभर चौकशी-पानसरेंच्या मारेकऱ्यांशी कनेक्शनचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:05 IST

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील शार्प शूटर परशुराम वाघमारे याच्याकडे महाराष्ट्र ‘एसआयटी’च्या पथकाने बंगलोर येथे सोमवारी तासभर चौकशी केल्याचे समजते.

ठळक मुद्देपाच वर्षांचे मोबाईल सीडीआर मागविले

कोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील शार्प शूटर परशुराम वाघमारे याच्याकडे महाराष्ट्र ‘एसआयटी’च्या पथकाने बंगलोर येथे सोमवारी तासभर चौकशी केल्याचे समजते. कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकºयांपर्यंत पोहोचण्या-साठी त्याच्याकडून काही पुरावे मिळतात का, याचा शोध पथक घेत आहे. त्याचे पाच वर्षांतील मोबाईल सीडीआर मागविले आहेत. त्याचे संशयित वीरेंद्र तावडे, समीर गायकवाड, फरार आरोपी विनय पवार, सारंग अकोेलकर यांच्याशी काही कनेक्शन आहे काय, याचा शोध पथक घेत असल्याचे एसआयटीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे या दोघांना अटक झाली आहे. या दोघांनाही पानसरे खटल्यामध्ये जामीन मिळाला आहे. या हत्येतील संशयित पवार व अकोलकर हे मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून फरार आहेत.‘एसआयटी’ला त्यांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. संशयित वाघमारेच्या चौकशीत कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबधी काही महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे समजल्याने महाराष्ट्राचे एसआयटी पथक रविवारी बंगलोरला रवाना झाले होते. या पथकाने सोमवारी बंगलोर एसआयटीच्या अधिकाºयांशी चर्चा करून वाघमारेकडे तासभर चौकशी केल्याचे समजते. याबाबत मात्र गोपनियता पाळली आहे.‘समोर आल्यास वाघमारेला ओळखू’संशयित परशुराम वाघमारेला माझ्यासमोर आणले तर त्याला ओळखू, असे पानसरे हत्या प्रकरणातील एका साक्षीदाराने कोल्हापुरात प्रसारमाध्यमांना सोमवारी सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकर ते लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांचा शुभ, अशुभ गोष्टींवर विश्वास आहे. त्यामुळे पहिल्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल शुभ मानून त्याच पिस्तुलातून अन्य दोन हत्या केल्याचा संशय या साक्षीदारांने व्यक्त केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा