शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुडणाऱ्या भावाला वाचवताना बहिणीचाही दुदैवी अंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 10:46 IST

Accident Gadhinglaj Kolhapur : पाय घसरून विहीरीत बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या बहिणाचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला. प्रेरणा मनोहर कांबळे (वय १८) व राजवीर किशोर तराळ (वय ८) अशी दुदैवी मृत बहिण- भावांची नाव आहेत.हिडदुग्गी (ता.गडहिंग्लज) येथील हृदयद्रावक घटनेने हलकर्णी पंचक्रोशीसह गडहिंग्लज तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देबुडणाऱ्या भावाला वाचवताना बहिणीचाही दुदैवी अंत ! गडहिंग्लज तालुक्यातील हिडदुग्गी येथील हृदयद्रावक घटना

गडहिंग्लज : पाय घसरून विहीरीत बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या बहिणाचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला. प्रेरणा मनोहर कांबळे (वय १८) व राजवीर किशोर तराळ (वय ८) अशी दुदैवी मृत बहिण- भावांची नाव आहेत.हिडदुग्गी (ता.गडहिंग्लज) येथील हृदयद्रावक घटनेने हलकर्णी पंचक्रोशीसह गडहिंग्लज तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी (१०) सायंकाळी प्रेरणा ही आपल्या घराशेजारी असलेल्या खोडगे यांच्या विहीरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती.सोबतीसाठी म्हणून राजवीरदेखील तिच्याबरोबर विहीरीवर गेला होता. धुणे धुवून झाल्यावर राजवीर हा हातपाय धुण्यासाठी पाण्यात उतरला. त्यावेळी पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रेरणासुध्दा पाण्यात उतरली. परंतु, दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले.सायंकाळी बराच वेळ झाला तरी दोघेही घरी परत न आल्यामुळे नातेवाईक आणि शेजार्‍यांनी शोधाशोध केली.त्यावेळी दोघेही विहिरीत बुडाल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्यांना पाण्यातून बाहेर काढून गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.प्रेरणा व राजवीर हे दोघे सख्खे चुलत बहिण-भाऊ होत.प्रेरणा ही गडहिंग्लज शहरातील जागृती प्रशालेत १२ वी कला शाखेत शिकत होती. तिच्या पश्चात आई -वडील व विवाहित बहीण असा परीवार आहे.राजवीर दुसरीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी-आजोबा व काका असा परिवार आहे. मनोहर कांबळे यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलीसात घटनेची नोंद झाली आहे . हवालदार पांडुरंग कुंभार अधिक तपास करत आहेत.शुभकार्यासाठी आले अन् ...!खाजगी कंपनीतील नोकरीमुळे राजवीरचे वडील सहकुटुंब गोव्यात वास्तव्याला आहेत. लहान भाऊ दीपकचे लग्न जमविण्यासाठी कांही दिवसापुर्वी ते गावी हिडदुगीला आले आहेत. भावाच्या शुभकार्यासाठी सहकुटुंब गावी आलेल्या किशोर यांच्या एकुलत्या मुलावर काळाने झडप घातली. वाढदिवसाच्या आनंदावर विरजण...!शनिवारी(१०)प्रेरणाची मोठी बहीण प्रज्ञा हिचा वाढदिवस होता. घरात वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच झालेल्या प्रेरणा आणि राजवीर यांच्या दुदैवी मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातSwimmingपोहणेkolhapurकोल्हापूर